टॉप बातम्या

पत्रकार संघटने पाटणबोरीच्या वतीने निरोप समारंभ

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
झरी, (१६ ऑगस्ट) : झरी-जामणी रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेहेरे साहेब यांची सुमारे पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अहमदनगर जिल्ह्यात बदली झाली.

यानिमित्त मांडवी बीट मधील बेल्लमपेल्ली या छोट्याशा निसर्गरम्य गावात छोटेखानी कार्यक्रमात पत्रकार संघटना पाटणबोरी च्या वतीने निरोप देण्यात आला. अधिकारी म्हणून मेहेरे साहेब रुजू झाल्यापासून परिसरातील वृक्षतोडी सोबतच वन्य प्राण्यांच्या शिकारीवर मोठ्या प्रमाणात आळा घातल्या गेला. परिसरात पाच वाघांचा मुक्त वावर असतांना सुद्धा त्यांनी कठीण परिस्थितीवर मात करून नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात मोलाची भूमिका बजावली.

या पार्श्वभूमीवर त्यांना पुढील वाटचाली करिता पत्रकार संघटने तर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या. साहेबांना पुढील कार्यास असेच यश लाभोत, हीच पत्रकार संघटनेची सदिच्छा...
Previous Post Next Post