सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (१६ ऑगस्ट) : दि.१५ आगस्ट २०२१ ला शामा प्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथील प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने सत्कारमूर्ती श्री.अनिल डोंगरे जिल्हा अध्यक्ष प.पूज्य शेषराव महाराज व्यसन संघटना, चंद्रपूर यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात श्री.अनिल डोंगरे यांचा जिल्हा संघटनेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन केले. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना अनिल डोंगरे यांनी मला भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश माझे राजकीय गुरू माजी अर्थमंत्री तथा अध्यक्ष लोखलेखा समिती विधिमंडळ महाराष्ट्र, आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव पद मला मिळाले. या पदाच्या माध्यमातून मला महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली. हे पद माझ्यासाठी शोभेचे पद नसून या पदाच्या माध्यमातून मी या संधीचे सोने करीत संघटनेचे व संघटनेच्या लोकांचे तसेच गोर-गरीब शेतकरी शेतमजूर जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे गुरु मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे.
मी आपला माणूस म्हणून आपले नेहमी माझ्यावर प्रेम आशीर्वाद आहे, अशेच प्रेम आशीर्वाद असू द्या! असे ते बोलले या सत्कार कार्यक्रमात लक्ष्मीकांत धानोरकर जिल्हा उपाध्यक्ष, प. पुज्य. शेषराव महाराज, पंडीत काळे जिल्हा कोषाधक्ष, प. पुज्य. शेषराव महाराज, अविनाश राउत जिल्हा सचिव, भालचंद्र रोहनकर, सुरेश दुबे, प्रकाश अल्गमकर, दिंगबर वासेकर तालुका अध्यक्ष राजुरा, दीपक ठाकरे तालुका अध्यक्ष मुल, विजय वासेकर तालुका अध्यक्ष पोंभुर्णा, महादेव मांडवकर तालुका अध्यक्ष वरोरा, गणपत चौधरी तालुका अध्यक्ष गोंडपिपरी, नारायण खापणे तालुका अध्यक्ष चंद्रपूर, साईनाथ कुणघटकर, स्वप्नील धूम्हणे, आनंदराव सोनुरले, बंडु सोनवणे, चंदू थीपे, संजय मुरस्कर इत्यादी बहुसंख्येने संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संघटक प.पूज्य शेषराव महाराज बालाजी बोरकुटे यांनी केले.
प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने अनिल डोंगरे यांचा सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 16, 2021
Rating:
