सह्याद्री न्यूज | संतोष कुलमेथे
राजुरा, (०४ ऑगस्ट) : मागील दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील तेंदूपानांचे बोनस लाभार्थ्यांना मिळाले नाही. अश्या तक्रारी वंचीत बहुजन आघाडी च्या राजूरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी ह्यांना मिळताच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत वन परिक्षेत्र अधिकारी ह्यांचे कार्यालय गाठून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा, अशा इशारा वंचीत बहुजन आघाडी राजूरा च्या वतीने निवेदनातून देण्यात आला.
कोरोना काळात आधीच ग्रामीण भागातील जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यात त्यांच्या हक्काचा पैसा शासन देण्यास विलंब लावत असेल तर, तालुक्यात मोठे जनआंदोलन सुरु करू अशी माहिती आज वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली.
निवेदन देतांना वंचीत बहुजन आघाडी चे महासचिव प्रणित झाडे, तालुका उपाध्यक्ष धनराज बोर्डे, बंडू वणकर, विजय जुलमे, सच्चीनानद रामटेके, वाघमारे साहेब, अरुण कुमरे, रायपुरे साहेब, वनकर साहेब, अभिलाष परचाके, पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दोन वर्षापासुन थकित असलेले तेंदूपानांचे बोनस वाटप करा - वंचीत बहुजन आघाडी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 04, 2021
Rating:
