टॉप बातम्या

शेगाव संस्थान चे विश्वत शिवशंकर पाटील यांचे निधन


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
बुलढाणा, (०४ ऑगस्ट) : शेगाव संस्थानचे विश्वत शिवशंकर भाऊ पाटील यांचे दुखद निधन झाले आहे. ते ८२ वर्षाचे होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन शेगाव संस्थान च्या वतीने सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून त्याच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

घरा जवळ असलेल्या शेतात होणार अंत्यसंस्कार

शिवशंकर पाटील मागील काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. घराजवळ असलेल्या शेतात त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाटील यांच्या कडून संत गजानन महाराज यांची झालेली आहे.
Previous Post Next Post