चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सन्मान जपणारा रिपाई पक्ष - पप्पू कागदे


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनावणे 
बीड, (०४ ऑगस्ट) : आज केज येथे युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे हे होते. प्रमुख पाहुणे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष दशरथ सोनवणे हे  उपस्थिती होते. तसेच प्रमुख उपस्थितीत राहुल सरवदे, बाळासाहेब ओव्हाळ, रवींद्र जोगदंड, दिलीप बनसोडे, रमेश निशिगंध, कैलास जावळे, विकास आरकडे, रमेश निशिगंध, मिलिंद भालेराव, संभाजी हजारे, कालिदास आरकडे, मसू बचुटे, मिलिंद वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पप्पू कागदे म्हणाले की, ना. रामदास आठवले साहेबांचा रिपाई पक्ष हा स्वाभिमानी व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून बेईमानी करणाऱ्यांना रिपब्लिकन जनता त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. पुढे बोलताना कागदे यांनी अतिक्रमित गायरान जमिनी आणि कार्यकर्त्यांना सक्षम बनविण्यासाठी शासकीय लाभाच्या विविध योजना यांची माहिती दिली. 
जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी केज विधानसभा मतदार संघातून या पुढे रिपाइंचा आमदार व्हायला हवा यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. 
दीपक कांबळे, राहुल हजारे, भास्कर मस्के, गौतम बचुटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिलीप बनसोडे यांनी केले. या बैठकीला तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सन्मान जपणारा रिपाई पक्ष - पप्पू कागदे चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सन्मान जपणारा रिपाई पक्ष - पप्पू कागदे Reviewed by सह्याद्री चौफेर on August 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.