सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वडसा, (०५ ऑगस्ट) : कोरोनाची दुसरी लाट ओसरताच शासन-प्रशासनाच्या वतीने राज्यात नुकतीच टाळेबंदी मध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने, मॉल, जीम, पार्लर सोबतच अनेक गोष्टी शिथील करण्यात आल्या. पण मात्र, शिथील करण्यात आलेल्या गोष्टींमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासुन बंद पडलेले थिएटर्स, सांस्कृतीक कार्यक्रम, नाट्यप्रयोग ईत्यादींचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे समस्त कलावंतांच्या व्यथा, वेदना शासनापर्यंत पोहचाव्यात, सोबतच राज्यव्यापी होत असलेल्या रंगकर्मी आंदोलनाला पाठींबा म्हणून झाडीपट्टीतही आंदोलन व्हावे, याकरीता ४ आगष्टला ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत प्रमुख ऊपस्थीत जेष्ट कलावंत प्रा.डॉ.शेखर डोंगरे, अनिरुद्ध वनकर, मुकेश गेडाम, हीरालाल पेंटर, परमानंद गहाने, नीतु बुद्धे, ताजुल ऊके, किरपाल सयाम, यासोबतच अनेक कलावंतांनी आपले विचार व्यक्त केले..सभेचे सुत्रसंचालन भास्कर पींपळे यांनी केले. येत्या ९ ऑगस्ट ला झाडीपट्टीची नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडसा येथे एक मोठे आंदोलन करावे असा उपस्थित सर्व कलावंतांनी एकमुखी निर्णय घेतला.
गेल्या अठरा महीन्यांपासुन टाळेबंदीमुळे झाडीपट्टीतीन नाट्यप्रयोग बंद असल्यामुळे येथील कलावंतांचा रोजगार हिरावला गेला. झाडीपट्टीतील नाटकांच्या भरोश्यावरती कलावंतांसोबतच संगीतकार, नेपथ्यकार, डेकोरेशनवाले, आणि रंगभुमीत काम करणाऱ्या अनेकांचे ऊदरनिर्वाह हे नाट्यप्रयोगावरच अवलंबुन असल्यामुळे आज त्यांच्यावर ऊपासमारीची पाळी आलेली आहे. परंतु शासन-प्रशासनातर्फे त्यांची कुठेही दखल घेण्यात आलेली नाही.
एकीकडे आज सर्वच राजकीय पार्ट्यांचे मोर्चे, मेळावे, आंदोलन, सभा ह्या प्रचंड गर्दीत सुुरु आहेत, परंतु कलावंतांच्या कार्यक्रमांना मात्र, परवानगी नकरण्यात येते आणि म्हणून शासनाचे लक्ष वेधण्या करिता येत्या ९ आगष्टला क्रांतीदिनाचे औचीत्य साधुन संपुर्न महाराष्ट्रातील वीवीध जील्यात "रंगकर्मी आंदोलन" करण्यात येत आहे आणि त्याच आंदोलनाला प्रतिसाद म्हणून झाडीपट्टीतील समस्त रंगकर्मींच्या वतीने मौजा वडसा येथे "महाआंदोलन" करण्यात येत आहे.
वडसा येथील नाकाडे चौकात सर्व कलावंत एकत्र येऊन शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत शांततेत "नाट्यगीरी" करत तहसील कार्यालयाकडे जाणार तहसील कार्यालय परीसरात पोहचल्यानंतर झाडीपट्टीच्या नांदीने आंदोलनाची सुरवात होईल, "टाळेबंदीमुळे कलावंतांच्या व्यथा" या विषयावरती पथनाट्य, गीतगायन, जेष्ट रंगकर्मींचे मनोगत, त्यानंतर कलावंतांचे एक शिष्टमंडळ मा.तहसीलदार साहेबांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात येईल व त्यानंतर आंदोलनाची सांगता करन्यात येईल. ईत्यादी संपूर्ण आंदोलनाचे स्वरुप असेल.
सदर रंगकर्मी आंदोलनाला जास्तीत जास्त कलावंत, संगीतकार, नेपथ्यकार, डेकोरेशनवाले, रंगभुमीचे मॅनेजर, गाडी चालक-मालक तसेच रंगभुमीशी संबंधीत सर्वांनी मोठ्या सख्येने ९ आगष्टला वडसा येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहुन आपल्या व्यथा शासनाच्या निदर्शनात आणाव्या, असे आवाहन झाडीपट्टी रंगकर्मी आंदोलन संघर्ष समीतीच्या वतीने करण्यात आले.
येत्या 9 ऑगष्टला झाडीपट्टीतील रंगकर्मी कलावंताचे वडसा येथे "महाआंदोलन"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 05, 2021
Rating:
