सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (०५ ऑगस्ट) : आज बीड येथे विद्यार्थिनी अस्मिता नेहरकर यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आज शुभेच्छा देण्यात आल्या. काल नुकताच लागलेला बारावीचा निकाल या निकालामध्ये के एस के महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारिका अस्मिता नेहरकर या विद्यार्थिनीने बारावी सायन्स शाखेतून 90 टक्के गुण मिळवल्याबद्दल त्यांचा आज सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार आदरणीय वैभव जी स्वामी साहेब सह उपस्थित बीड जिल्हा सत्र न्यायालयातील एडव्होकेट कायदे सल्लागार कायदेपंडित विलास जी जोशी साहेब तसेच उपस्थित हितोपदेश जी वडमारे, संदेश जी वडमारे, राजेश जी वडमारे, अशोक जी धुताडमल तसेच अस्मिता नेहरकर यांचे बंधू गोटू भैया नेहरकर तसेच उपस्थितीत संजय देवा कुलकर्णी, कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड यांची यावेळी उपस्थिती होती.
के एम के महाविद्यालय बारावी सायन्सची विद्यार्थीनी अस्मिता नेहरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 05, 2021
Rating:
