पायी जाणाऱ्या महिलेचा अज्ञात तरुणाने केला विनयभंग


                        (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०४ ऑगस्ट) : महिला व मुलींची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज तरुणांची मजल आता विनयभंग करण्यापर्यंत गेल्याने स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या टपोरी मुलांच्या छेडखानीमुळे शाळा महाविद्यालयातील मुली तर त्रस्त आहेतच, आता महिलांनाही या टपोरी मुलांनी त्रास देणे सुरु केले आहे. नुसता त्रासच नाही तर त्यांचा विनयभंग करण्यापर्यंत ही मुलं निर्ढावली आहेत. एका १७ वर्षीय हुल्लडबाज तरुणाने रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना २ ऑगष्टला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ही महिला रस्त्याने पायी आपल्या घरी जात असतांना अचानक समोर आलेल्या एका तरुणाने तिच्या शरीराला स्पर्श करून पळ काढला. अज्ञात तरुणाने अशा प्रकारचे कृत्य केल्याने महिला चांगलीच भांबावली. तिने सरळ पोलिस स्टेशन गाठून अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. 
शहरात महिला व मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढीस लागले असून विनयभंगाच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा व महाविद्यालयातील तरुणींचा पाठलाग करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या टपोरी तरुणांची मजल आता महिलांशी अंगलट जाण्यापर्यंत वाढली आहे. आईच्या घरून पायी आपल्या घरी जात असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा भररस्त्यात विनयभंग करण्यात आला. महेर कापड केंद्राच्या मागील रस्त्याने ही महिला पायी जात असतांना अचानक समोर आलेल्या अज्ञात तरुणाने तिला शारीरिक स्पर्श करून पळ काढला. या प्रकाराने महिला चांगलीच धास्तावली. तिने तत्काळ पोलिस स्टेशन गाठून आपबिती कथन केली. तसेच अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारी वरून अज्ञात तरुणाविरुद्ध भादंवि च्या कलम ३५४(अ)(१)(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आनंदराव पिंगळे करीत आहे.
पायी जाणाऱ्या महिलेचा अज्ञात तरुणाने केला विनयभंग पायी जाणाऱ्या महिलेचा अज्ञात तरुणाने केला विनयभंग Reviewed by सह्याद्री चौफेर on August 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.