माझे आदरणीय गुरू मा. श्री.सुधीर भाऊ यांचे नवनियुक्त भाजपा प्रदेश सचिव अनिल डोंगरे यांनी मानले आभार



सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (०४ ऑगस्ट) : अनिल डोंगरे एका छोट्याश्या गावतील शेतकऱ्यांच्या मुलाला आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गाव,तालुका पातळीवरून भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश 'सचिव' पदी नियुक्ती करून महान काम माझ्यासाठी असून हेफक्त भारतीय जनता पक्षातच होऊ शकते हे पुन्हा एकदा सिध्य केले.  
 
 श्री.अनिल डोंगरे यांचा मा.आमदार श्री.सुधीर भाऊच्या माध्यमातून मागील २५ वर्षापूर्वी राजकीय व सामाजिक शेत्रात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रवास सुरू झाला. हा प्रवास मा.आमदार श्री. सुधीर भाऊच्या आशीर्वादाने फुलत गेला आणि विचोडा, चांदसूर्ला ग्रामपंचायतवर सतत तीनदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावित सरपंच,उपसरपंच पद आपल्या कडे कायम ठेवत हा प्रवास असाच सुरू ठेवला. त्यासोबत भाजपा तालुका महामंत्री ते भा.ज.यू.मो तालुका अध्यक्ष पद भूषवित प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती सामाजिक संघटनेत जवळपास १० ते१५ वर्षापासून काम करीत असताना जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी घेत एक प्रकारे तारेवरची कसरतच म्हणावं. याच मुळे  संपूर्ण कार्याची मा.श्री.सुधीर भाऊ च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने दखल घेत सन.२०१७/१८ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसन मुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित करत या कार्याचा गौरव करण्यात आला.

मा. आमदार सुधीर भाऊ यांच्या भाषणातील ऐकक  वाक्य आजही त्यांच्या स्मरणात आहे असे ते सांगतात.  पक्षात काम करणारा व्यक्ती, मग तो गरीब असो या श्रीमंत व तो कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याच्या चांगल्या कामाची कदर केली जाणार, त्यांना पक्षात प्रमुख स्थान,मान सन्मान मिळणार हे माझ्या रूपाने  उदाहरण घेता येईल. हे इतर पक्षात होत नाही.

इतर संघटनेत नेते भाषणात बोलतात पण ते कृतीत नसतात म्हणून भाऊ आपणास! 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले' दिला शब्द केला पूर्ण! या तत्त्वाने चालणारा नेता म्हणून भाऊ ची संपूर्ण महाराष्ट्र भर ओळख आहे. आज मी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदाच्या माध्यमातून विचोडा ते मुंबई असा राजकीय प्रवास सुरू झाला. हे सगळ सुधीर भाऊ सारख्या नेत्याच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घडू शकतात. हे पुन्हा मी सांगू इच्छितो.

माझ्या निवडीबद्दल माझ्यावर विश्वास ठेऊन पक्षाच्या महत्वाच्या पदाची धुरा देत माझ्यावर प्रेम करणारे  मा.आमदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री, मा.श्री. हंसराजजी अहिर माजी गृह राज्यमंत्री भारत सरकार व भारतीय जनता पक्षाच जिल्ह्यच तडपदार युवा नेतृत्व मा.श्री.देवराव दादा भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष, मा.श्री.आमदार बंटी भांगडिया, मा.श्री.विक्रांत पाटील प्रदेश अध्यक्ष भा.ज.यू.मो महाराष्ट्र, मा.श्री.अतुल देशकर माजी आमदार, मा.श्री. हरिशजी शर्मा प्रदेश सदक्ष भाजपा महाराष्ट्र, मा.श्री.मंगेश गुलवाडे जिल्हा  अध्यक्ष महानगर भाजपा, मा.श्री.प्रमोदजी कडू भाजपा ज्येष्ठ नेते, मा.श्री.संजय धोटे माजी आमदार,  मा.श्री.सुदर्शन निमकर माजी आमदार, मा.श्री. जैनुधिन जेव्हेरी माजी आमदार, मा.श्री.राजेंद्र गांधी जिल्हा महामंत्री भाजपा, मा.श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा, मा.श्री.संजय गजपुरे जिल्हा महामंत्री, मा.श्री.बिरिजभूषण पाझरे जिल्हा महामंत्री महानगर, मा.श्री.रामपाल सिह भाजपा नेते, मा.सौ. संध्याताई गुरनुले अध्यक्ष जी.प.चंद्रपूर, मा.श्री.आशिष देवतळे जिल्हा अध्यक्ष भा.ज.यू.मो,  मा.सौ.राखीताई कणचर्लावार महापौर म. न.पा. मा, श्री.राहुल पावडे उपाधक्ष म. न.पा, मा.श्री.सुभाष कासमगोटुवार जिल्हा महामंत्री, मा.सौ.अंजलिताई घोटेकर जिल्हा अध्यक्ष महीला आघाडी महानगर, मा.सौ.अलका आत्राम जिल्हा अध्यक्ष भाजपा महीला आघाडी ग्रामीण, मा.सौ.शोबताई पिदुरकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, मा.श्री.राजेश मुन, मा.श्री.विशाल निबालकर जिल्हा अध्यक्ष भा. ज.यू.मो.महानगर तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी नेते मंडळी व कार्यकर्त्या सह अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माझे आदरणीय गुरू मा. श्री.सुधीर भाऊ यांचे नवनियुक्त भाजपा प्रदेश सचिव अनिल डोंगरे यांनी मानले आभार माझे आदरणीय गुरू मा. श्री.सुधीर भाऊ यांचे नवनियुक्त भाजपा प्रदेश सचिव अनिल डोंगरे यांनी मानले आभार Reviewed by सह्याद्री चौफेर on August 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.