युवकाचा घोडदरा शेत शिवारात आढळला संशयास्पद मृत्यूदेह

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (०५ ऑगस्ट) : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या घोडदरा शेत शिवारात एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यूदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सूत्राच्या माहितीनुसार तो युवक त्या शिवारातील नसल्याचे माहिती देत तो अर्जुनी या गावातील असून प्रमोद नामदेव रामपुरे असे त्याचे नाव आहे. त्याच्या खून करून घोडदरा शेत शिवारात आणून टाकला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली.

सदर घटना आज सकाळी १० च्या दरम्यान घडली असावी असा अंदाज आहे. घोडदरा येथील गजानन धनवे यांच्या शेतातील मृत्यूदेह आढळला असून, याची मारेगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळाली. माहिती वरूनमारेगाव ठाणेदार जगदीश मंडलवार आपल्या चमूसह घटनास्थळी पोहचले अशी माहिती आहे.

दरम्यान,निळी जीन्स पॅन्ट,चौकुडा शर्ट व बूट परिधान केला आहे. मृतकाबाबत ओळख पटली, परिणामी त्याच्या शरीरावर असलेल्या जखमांनी त्याचा खून झाला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.
युवकाचा घोडदरा शेत शिवारात आढळला संशयास्पद मृत्यूदेह युवकाचा घोडदरा शेत शिवारात आढळला संशयास्पद मृत्यूदेह Reviewed by सह्याद्री चौफेर on August 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.