आदिवासी चालक-वाहक प्रशिक्षणार्थीचे दिनांक 5 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (०५ ऑगस्ट) : एसटीमध्ये चालक-वाहक या पदावर घेण्यासाठी आदिवासी समाजातील बांधवांना पांढरकवडा येथील चालक-वाहक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणानंतर नोकरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन एसटीच्या मुंबई कार्यालयाने दिले. मात्र, सात वर्षाचा कालावधी होत असतानाही त्यांना कामावर न घेतल्यामुळे प्रशिक्षित झालेल्या चालक-वाहकांना पाच ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.

एसटीमध्ये चालक वाहक भरती करण्यापूर्वी पांढरकवडा येथील चालक वाहक प्रशिक्षण केंद्रात आदिवासी बांधवांना प्रशिक्षण दिल्या जाते प्रशिक्षण देण्यापूर्वी आरक्षणांतर्गत या बेरोजगारांना नियमावलीत अर्ज भरून मागितला जातो हा अर्ज भरून दिल्यानंतर त्यांच्या रीतसर मुलाखती घेतल्या जातात आणि मुलाखती घेतल्या नंतर त्यांना प्रशिक्षण दिल्या जाते पांढरकवडा च्या प्रशिक्षण केंद्रातून त्यांच्यावर १८० चालक-वाहक प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन सक्षम झाल्याचे प्रमाणपत्र पांढरकवडा येथील प्रशिक्षण केंद्रातून मिळवले एसटी महामंडळाने चालक वाहकांची चाचणी घेऊन कामावर घेण्याचे निश्चित केले मात्र २०१४ ते १७ या कालावधीत या बेरोजगारांना कामावर घेतले नाही अर्ज विनंती सर्व केल्यानंतरही एसटी महामंडळ प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आता २०२१ चा ऑगस्ट महिना येत आहे.

 २०१४ ते २०१९ या कालखंडात बेरोजगारांना नोकरी न दिल्यामुळे त्यांनी एसटी प्रशासन जिल्हाधिकारी आणि मुंबईचे मध्यवर्ती कार्यालयांना आत्मदहनाची परवानगी मागितली होती. मात्र हा निर्णय मागे घेऊन ५ ऑगस्ट पासून अमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय समोर करण्याचा निर्णय घेतला असून येत्या काही काळात जर यांना न्याय मिळाला नाही यांना नोकऱ्या दिल्या नाही तर अंतिम श्वासापर्यंत असेच आमरण उपोषण चालू राहील विशेष म्हणजे जोपर्यंत लेखी निश्चित तारीख अशा स्वरूपात आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असेच चालू राहील.
आदिवासी चालक-वाहक प्रशिक्षणार्थीचे दिनांक 5 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू आदिवासी चालक-वाहक प्रशिक्षणार्थीचे दिनांक 5 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू Reviewed by सह्याद्री चौफेर on August 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.