सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (०५ ऑगस्ट) : महागांव तालुक्यातील त्यांच्या राहत्या घरी वागद इजारा , पशुचिकित्सा व्यवसायी संघटना यवतमाळ जिल्हा च्या वतीने शेतकरी नेते मनिष भाऊ जाधव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला १५ जून पासून तर ३ जुलै पर्यंत चाललेल्या पशुधन पर्यवेक्षक सहाय्यक पशुधन विकास आधीकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्याच्या मान्यतेस्तव असहकार कामबंद आंदोलन या विभागातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चालू होते या हक्क व अधिकाराच्या मागण्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा यवतमाळ जिल्हा कडून जिल्हाध्यक्ष म्हणून समर्थन व पाठिंबा देऊन सातत्याने १५ जून पासून या ज्वलंत शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर व आंदोलनाच्या माध्यमातून मांडून या मागणीला शासनाला दखल घेण्यास भाग पाडले शेतकऱ्यांसह या पशुधन पर्यवेक्षक व पशुधन विकास अधिकारी संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना ३ जुलै २०२१ च्या मंत्रालयात पशुसंवर्धन मंत्री सुनील भाऊ केदार यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या बैठकीत मागणीच्या संदर्भाने मोठा दिलासा पशुधन पर्यवेक्षक व पशुधन विकास संवर्गातील प्रलंबित मागण्यांच्या संदर्भाने मोठा दिलासा मिळाला आहे याचाच भाग म्हणून आज या पशुचिकित्सा व्यवसाय संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने डॉ संभाजी घुगे डॉ किशोर जाधव डॉ रामचंद्र साखरेपशुचीकीत्सा व्यवसायी संघटना यवतमाळ शाखा पुसद महागाव, डॉ. ठाकरे.डॉ.के डि.जाधव डॉ.डेरे डॉ धनोकार, डॉ.हनवते, डॉ.चव्हाण, डॉ घुगे डॉ. काईट, डॉ.अंकुश जाधव, डॉ.राठोड,डॉ सलीम, डॉ.साकिब डॉ.सुखदेव राठोड, डॉ.अविनाश, डॉ.रावते, डॉ.आडे,डॉ. बेले, डॉ. रुमाले, डॉ. डोंगरे,डॉ.रुशिकेष, पशुधन पर्यवेक्षक व वेठीस धरले गेलेल्या पशूपालक शेतकऱ्यांमध्ये या शासन निर्णयाने दिलासा मिळाल्याने नवचैतन्याचे व आनंद व समाधान व्यक्त करताना दिसत आहे.
पशुचिकित्सा व्यवसायी संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने मनीष भाऊ जाधव यांचे जाहीर सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 05, 2021
Rating:
