चळवळ करणाराच नाही तर चळवळ जगणारा पँथर दिपकभाई केदार...!

सह्याद्री काव्य |
पँथर हा शब्दच दर्शवतो की त्याचं आयुष्य फुलांनी सजलेलं आहे की काट्यांनी गजबजलेलं आहे. तो वातानुकूलित काचाच्या ऑफिसात बसून सामाजिक परिवर्तनाच्या नुस्त्या बाता मारून वर्तमानपत्राचे रकाने भरवतो की समाजावर होणारे वार स्वत:च्या छातीवर घेऊन रात्रंदिवस लढतो पण तरिही तो मुख्य प्रसारमाध्यमात कधीच नसतो. हे कोणत्याही जाणकार माणसाला कळेल. त्याच्या आयुष्यात वाढदिवस, ॲनिवरसरी, बारसं , तेरसं याला स्थानच नाही जो दररोज असतो एखाद्या मोर्चा, आंदोलनात देत असतो घोषणा गगनभेदी,प्रसंगी जिरवत असतो मस्ती सरकारची त्याच्या कातडीबचाऊ प्रशासनाची आपल्या संविधानिक लढ्याच्या जोरावर. जो फक्त चळवळ करतच नाही तर चळवळ जगतो असा नव्या दमाचा, महाराष्ट्रातील युवकांच्या मनावर अक्षरशः गारुड घालणारा नेता पँथर दिपकभाई केदार.
दररोज महाराष्ट्रात अनुसुचित जाती, जमाती आणि महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत. एका घटनेचे अश्रु सुकले न सुकले की दुसरी घटना हजरच. मी तर असं म्हणेल हे अत्याचार फक्त वंचित,शोषितांवरीलच नसून महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर होणारे पाशवी बलात्कारही आहेत. बिहार, उत्तरप्रदेश ला जंगलराज म्हणून चिडवणारे आमचे राजकारणी यांच्या डोळ्यांना महाराष्ट्र राज्यातील चाललेला हा नंगानाच दिसत नाही हे दुर्दैव. परंतु ह्या नंग्यानाचाच्या नांग्या ठेचण्याचं काम पँथर दिपकभाई न थकता करत आहेत हे अवघा महाराष्ट्र बघतो आहे.
नुकताच परभणी जिल्ह्यातील सेलु येथे त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला. ह्या हल्ल्यावरून असे दिसते की जातीवादी शक्ति आता दिपकभाईंना रोकु शकत नाही म्हणून त्यांना रोकण्याचे असे नाजायज प्रयत्न ते करत आहेत. आरे याद राखा जातीवादी गिधाडांनो हा ऑल इंडिया पँथर सेनेचा झंझावात आता शमणारा नाही आणि या सेनेचा सरदार कुणापुढे नमणारा नाही. पँथर दिपकभाई केदार यांनी कार्यकर्त्यांच्या हातात निळे झेंडे आणि गळ्यात निळ्या शाली दिल्या नाही तर त्यांच्या डोक्यात पँथरी विद्रोह आणि रक्तात क्रांतिच्या मशाली पेटवल्या आहेत. तुम्ही प्रतीक्रांतीला जन्म देण्याचे प्रयत्न करा आम्ही संविधानिक मार्गाने क्रांतीच्या घोषणा देत प्रतिक्रांतीला गर्भातच मारु हे लक्षात ठेवा.
आमचे मित्र कवी मंगेश जी. एके ठिकाणी असं म्हणतात, 
"मी छातीत गोळी झेलणार हाय पण क्रांतीचं वादळ शमणार नाय"
 ऑल इंडिया पँथर सेनेचे सेनापती पँथर दिपकभाई केदार यांच्या हल्ले कराल त्यांना संपवाल आणि पँथर चळवळ संपेल अशी दिवास्वप्न पहाणारांनो ते कदापी शक्य नाही कारण पँथर चळवळ आणि पँथर दिपकभाई केदार फक्त आमचे नेते राहिलेले नाहीत तर ते एक विचार बनले आहेत. तुमचे दगड, तुमच्या गोळ्या माणूस मारु शकतात विचार नाही. 
जातीवाद्यांनो तुम्हाला शुभेच्छा, आम्ही समर्थ आहोत तुमचे हल्ले पचवण्यासाठी. परंतु ऑल इंडिया पँथर सेना समाजाच्या केसाला धक्का सुद्धा लावु देणार नाही हे मात्र तुमच्या डायरीत लिहून ठेवा. 
आमचे नेते पँथर दिपकभाई केदार यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा शब्दप्रपंच.......! 
     
लेखक: किरणभाऊ फुगारे
 (जिल्हाध्यक्ष,नांदेड) 
 मो. 9158538256
चळवळ करणाराच नाही तर चळवळ जगणारा पँथर दिपकभाई केदार...! चळवळ करणाराच नाही तर चळवळ जगणारा पँथर दिपकभाई केदार...! Reviewed by सह्याद्री चौफेर on August 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.