कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे - आरोग्य विभाग

बीड, (५ ऑगस्ट) : जगामध्ये कोरोना विषाणू च्या संकटाने थैमान घातले असून, या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रा तर्फे आणि राज्य सरकार तर्फे मोहीम राबवून चांगल्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत. 

लसीकरणाची अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था सरकार कडून करण्यात आलेली असताना काही लोलं कोरोना लसीच्या संदर्भामध्ये विविध चर्चा करत आहेत. लस घ्यावी का ना घ्यावी अशा प्रकारच्या चर्चेला सध्या बीडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच उधाण आलेले आहे. असे असताना बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत चंपावती शाळा नगर रोड बीड या ठिकाणी बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष असणारे कर्तव्यनिष्ठ शैल्य चिकित्सक श्री. सुरेश साबळे साहेब यांनी ही व्यवस्था केलेली आहे.

आज कोरोना लस घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना रेखाताई अंधापूरे आणि कुमारी भारतीताई अंधापुरे सह राणीताई माळवे यांनी ही व्यवस्था चांगली आहे. या ठिकाणी लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच तरुण वर्ग, सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी व  महिलांसाठी तसेच सर्व अठरा ते 40 वयोगटातील बंधू आणि भगिनीसाठी देखील घेता येईल अशी व्यवस्था या चंपावती शाळेमध्ये जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.

 लस सुरक्षित आहे. ही लस भारतीय असून या लसीच्या बाबतीत कोणीही किंचितही शंका निर्माण करू नये, सर्वांनी सुरक्षित आसलेली लस घ्यावी आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाचे सर्व नियमाचे कठोरात कठोर पालन करावे असेही यावेळी रेखाताई अंधापुरे आणि राणीताई माळवे सह कुमारी भारतीताई अंधापुरे यांनी बोलताना सांगितले.

 कुमारी भारतीताई पुढे बोलताना म्हणाल्या की, सर्व तरुण बंधू आणि भगिनींना लस टोचून घ्यावी. या कोरोना संकटाला बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे व ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी पुढे यावे.
नुकताच बारावीचा निकाल जाहिर झाला. त्या अनुषंगाने  सर्वांना शुभेच्छा व पुढील वाटचालीस पुनःश्च शुभेच्छा. सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करावा आणि आपले नाव देशा मध्ये लौकिक करावे असे ताई म्हणाल्या.

बीड जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे आणि त्यांचे सर्व डॉक्टर्स स्टाफ नर्स वार्ड बॉय या सर्वांचे आरोग्य प्रशासनाच्या कामाचे रेखाबाई अंधापुरे आणि राणी ताई माळवे सह कुमारी भारती ताई यांनी भरभरून कौतुक केले. तेव्हा सर्वांनीच कुठलीही शंका न ठेवता कोविड लस घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे - आरोग्य विभाग कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे - आरोग्य विभाग Reviewed by सह्याद्री चौफेर on August 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.