दैनंदिन व आठवडी बाजार त्वरीत सुरु करा- राजु झोडेंची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२८ ऑगस्ट) : भाजीपाला पिकवणांऱ्या शेतकऱ्यांनी आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बल्लारपूर तहसील कचेरीसमोर भाजीपाला फेकून सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश आज शनिवारी व्यक्त केला. 
     
कोरोनाच्या काळात मागील वर्षीपासून बाजारपेठा व आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला पिकवणांऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकर्‍यांनी पिकवणांऱ्या मालाला योग्य हमीभाव व आठवडी व दैनंदिन बाजारपेठ बंद असल्याने प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. एकीकडे सरकारने मोठमोठे मॉल, दारूची दुकाने व इतर व्यवसाय सुरू करण्याची सूट दिली असताना आठवडी बाजार तसेच दैनंदिन बाजार अजूनही बंद ठेवलेले आहेत. सरकार व प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे पिकवलेल्या शेतमालाला विकायचे कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरू असता तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भावु मिळून चार पैसे मिळाले असते. शेतकरी मोठ्या कष्टाने भाजीपाला पिकवित आहे. परंतु आठवडी बाजार व दैनंदिन बाजार बंद असल्याने कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागत आहे. हे खरे वास्तव आहे. सरकार व प्रशासनाची उदासीनता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. यावर सरकारने तात्काळ लक्ष देऊन भाजीपाला विकणांऱ्या शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी व त्यांच्या मालाला योग्य व रास्त भाव मिळण्याकरिता आठवडी बाजार व दैनंदिन बाजार तात्काळ सुरू करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली.

शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला सरकार व प्रशासनाने केराची टोपली दाखवली तर या विरोधात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कचेरीवर शेतकऱ्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार असा इशारा राजूभाऊ झोडे यांनी प्रशासनाला एका प्रसिध्द पत्रकातुन दिला आहे .
दैनंदिन व आठवडी बाजार त्वरीत सुरु करा- राजु झोडेंची मागणी दैनंदिन व आठवडी बाजार त्वरीत सुरु करा- राजु झोडेंची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on August 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.