विज कनेक्शन कापण्याचा सपाटा सुरुच, आज कुंभा येथील विज पुरवठा खंडित

                         (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (२८ ऑगस्ट) : तालुक्यात विज ग्राहक कनेक्शन कापण्याचा सपाटा सुरु झाल्याचे दिसून येत  आहे. "आज आत्ता ताबडतोब" भरा अशी वितरणची दबंग गिरी असल्याने विज ग्राहकाला काहीच वेळ दिली जात नाही, किंबहुना विनंती ला मान ही देत नाहीत,अशी ओरड विज ग्राहकांतून आहे.
 
साहेब थांबा भरतो हो, लाईट कापू नका म्हणत नाही तोपर्यंत कुंभा येथील व्यावसायिक ग्राहकांची बत्ती गुल झाली. खेड्यात महावितरण कंपनीचे कर्मचारी सरसकट लाईट  जबरीने विद्युत पुरवठा खंडित लोकांच्या करीत असल्याने ग्राहकात तीव्र नाराजीचा सुरु उमटत आहे. 
आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांनी कुंभा येथील घराच्या तारा काटल्याचे कळते, साहेब भरतो जी, थांबा कापू नका! अशी आर्तहाक असतांना सुद्धा विज कंपनीकडून जाणून बुजून लोकांचा विद्युत पुरवठा खंडित करून त्रास देत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, घरादारात अंधार असला की, बाहेर पडण्याची भीती असते. शिवाय मोल मजुरी ठप्प असून, सध्या परिस्थिती लोकांची बिकट आहे तरी, सुद्धा ग्राहक भरण्याच्या तयारीत आहे. जाऊदे बा! घरात अंधार बरा नाही म्हणून, लाईट बिल भरायला वेळ मागला जात आहे. परंतु निगरगट्ट वितरण ऐक ना, ऐकून घेत नसल्याने ग्राहकांची सरसकट घराची विज काटली जात आहे. त्यामुळे वितरण च्या अजब-गजब कारभारावर येथील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. 
बिल भरण्यास तयार असतांना सुद्धा अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैर वापर करीत ग्राहकांवर केलेला अन्यायच आहेत. अशा निगरगट्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावीत असे ग्राहकांतून बोलल्या जात आहेत.
मागील काही दिवसांमध्ये राजकीय पक्षांनी केलेले आंदोलन हे फक्त दिखावाच होता की काय? असा जनतेतून सूर येत आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या केला जात असलेला खंडित विद्युत पुरवठा हा अन्यायकारक असून, विज कापणी त्वरित थांबवून काहीतरी सवलत देण्यात यावी असे  जनतेतून बोलले जात आहे.
विज कनेक्शन कापण्याचा सपाटा सुरुच, आज कुंभा येथील विज पुरवठा खंडित विज कनेक्शन कापण्याचा सपाटा सुरुच, आज कुंभा येथील विज पुरवठा खंडित Reviewed by सह्याद्री चौफेर on August 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.