Top News

मानकापुर येथे गुलाबी बोंडअळी व सुरक्षित फवारणी कार्यशाळा संपन्न

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (२८ ऑगस्ट) : कृषि विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत तालुका कृषि अधिकारी कार्यालय कळंब तर्फे सध्य स्थितीत कापशिवरील संभाव्य गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व पिकावर कीटकनाशके फवारणी करतांना होणाऱ्या विषबाधा टाळण्यासाठी कृषि विभागाची गावोगावी, शेत शिवारात जनजागृती मोहीम सुरु आहे. 
या अनुषंगाने तालुक्यातील मानकापुर ग्राम पंचायत कार्यालयात सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेचे अध्यक्ष प्रशिलभाऊ साळवे सरपंच ग्रामपंचायत मानकापूर होते. तर प्रमुख मार्गदर्शक एस. एस. भगत मंडळ कृषी अधिकारी कळंब यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले, तसेच डी.डी. उगले कृषी सहाय्यक यांनी कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळी एकात्मिक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. एम. एस. गोफने कृषी पर्यवेक्षक यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध घटकांवर योजना लाभ घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.

कार्य शाळे मध्ये शेता वर जाऊन गुलाबी बोंड आळी व इतर शत्रू कीटक तसेच मित्र कीटकांची ओळख करून देण्यात आली व फवारणी सुरक्षा किटचे शेत मजुरांना वाटप करण्यात आले.

 याप्रसंगी सुधाकर पवार उपसरपंच, हनुमंत रावजी गाडगे, कृषी मित्र मोहन भोयर तथा कृषि सहाय्यक महेंद्र ओंकार व गावातील शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक आय. यू. मापारी यांनी केले.  

Post a Comment

Previous Post Next Post