अभिष्टचिंतन!! "साहित्य विश्वातील एक मेघा "

 शब्दांचा खेळ खेळू लागली
    तु ग सखे , लेखणी सवे 
   शब्दांनीच जिंकले तु साऱ्यांना 
   तुच तुझ्या लेखणीने ॥

"सहज सुचलं" या साहित्यिक समुहाच्या मार्गदर्शिका म्हणून लाभलेल्या व आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्या मेघाताई रामकृष्ण धाेटे यांचा आज वाढदिवस!

ताई, शतायुषी व्हा!!

तुमच्या आयुष्याच्या हा प्रवास लेखणीच्या सोबतीने निरंतर सुरू असावा आणि तुमच्या लेखणीचा गंध सर्वत्र पसरावा हीच सदिच्छा!

मेघा धाेटे यांनी नागपूर विद्यापीठातून एम.ए.एल.एल.बी.बी.एड. ची पदवी संपादन केल्यावर राजुरा येथील इंफ्ट जीजस इंग्लीश हायस्कूल मध्ये त्या अध्यापन करीत आहेत. त्यांच्या साहित्यिक क्षेत्राबद्दल बोलायच म्हटलं तर विविध वृत्तपत्रातून सामाजीक, स्त्री विषयक लेखन प्रसिध्द झाले आहे. आकाशवाणी नागपूर आणि चंद्रपूर येथे मुलाखत आणि त्यांचे लिखाण प्रसारीत झाले आहे.

विविध कवी संमेलन, सोशल मीडियावर कविता व लेख सादरीकरण त्यांच्या साहित्य विश्वाची आपल्याला ओळख करून देतात.
साहित्यिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यामुळे मेघा ताईनी आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. रक्तदान, वृक्षारोपण, सामाजिक वनीकरण यात विविध संस्थेमार्फत त्या सक्रिय सहभाग घेतात.
कला क्षेत्रात सुद्धा मेघा ताई यांची भरारी कौतुकास्पद आहे. विविध एकपात्री प्रयोग (मी सावित्री फुले बोलतेय, विवेकानंद, बाबाना श्रद्धांजली, मोबाईलचा गोंधळ, ती फूलराणी) त्यांनी केले आहेत. गीत गायन आणि नृत्याची आवड असलेल्या मेघा ताईचा सन 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, नाशिक येथे सहभाग साेबतच सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे विविध शैक्षणिक कृतीसत्रात त्या सहभागी झाल्या आहेत.
जून 2019 अहमदनगर येथे नवरत्न साहित्य परिषद तर्फे नारी रत्न पुरस्कारने त्यांना सम्मानित करण्यात आले आहेत.
त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
विविध पैलूंच्या धनी असलेल्या आपल्या मेघा ताईला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 
जाता जाता...

         साहित्याच्या नभात 
         मेघ असे गरजले 
      प्रत्येक गर्जना त्या मेघांची 
      शब्दरुप घेवुनी बरसले ॥ 
~सुविधा बांबाेडे चंद्रपूर संयाेजिका सहजं सुचलं महिला व्यासपीठ ९९७०९९८६१३
अभिष्टचिंतन!! "साहित्य विश्वातील एक मेघा " अभिष्टचिंतन!! "साहित्य विश्वातील एक मेघा " Reviewed by सह्याद्री चौफेर on August 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.