सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२८ ऑगस्ट) : तालुक्यातील फुलसावंगी पी एच सी अंतर्गत कासारबेहळ येथे यांच्या उपस्थितीत आरोग्य कॅम्प लावण्यात आला. शुक्र. दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी सह्याद्री न्यूज ने येथील परिसरात टायफाईड मलेरिया डेंगू सदृश्य आजाराचे थैमान असल्याचे वृत्त पब्लिश केले होते, या गंभीर विषयावर आमच्या प्रतिनिधीने सामाजिक जाणीवेतून माजी सदस्य संदीप ठाकरे व आरोग्य अधिकारी जब्बार पठाण यांच्याशी संपर्क साधून गावातील आरोग्याबाबतच्या समस्या अवगत केल्या होत्या, त्याची आज दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी आरोग्य अधिकारी पठाण यांनी दखल घेतली व कासारबेहळ येथील जि प प्राथमिक शाळेत कॅम्प लावण्यात आला. यामध्ये डॉ. बताने, आरोग्य सेवक देवारे, उबाळे, नर्स देवतळे मॅडम, ग्रामपंचायत सरपंच शरद राठोड उपसरपंच विष्णू जाधव, पोलीस पाटील रामेश्वर राठोड (सेवा नगर), आशा वर्कर ठाकरे ताई, ग्राम. शिपाई दिलीप पिटलेवाढ, प्रदीप बरडे व कासारबेहळ पोलीस पाटील अशोक करे, तलाठी खडसे हे हजर होते.
यावेळी आरोग्य सेवकांनी घरोघरी जाऊन पाणी चेक केले. डॉ. देवारे यांनी टाकीतील पिण्याचे पाणी खाली करून किमान सात दिवसाचा कोरडा दिवस पाळा असा सल्ला दिला.
आयोजित आरोग्य तपासणी केंद्र (कॅम्प) ला कासारबेहळ, सेवानगर येथील लहान मुलं, युवक, तरुण तरुणी, महिला पुरुष, जेष्ठ नागरिक व समस्त ग्रामस्थांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरातील जनता टायफाईड मलेरिया डेंगू सदृश्य आजाराने त्रस्त होते, शिवाय आरोग्य सेवक ही फिरकत नव्हते, त्याकरिता बाहेरगावी जाण्यासाठी विविध अडचणी येत होत्या, परंतु या कॅम्प मुळे गावात थैमान घातलेल्या सदृश्य आजारांपासून कांहीसा दिलासा मिळेल असा आशावाद गावाकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सह्याद्री न्यूज ची घेतली दखल : कासारबेहळ येथे आरोग्य तपासणी (कॅम्प) ला सुरुवात!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 28, 2021
Rating:
