सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे
पुणे, (२८ ऑगस्ट) : मनुष्यबळ लोकसेवा विकास ट्रस्ट यांच्या तर्फे देण्यात येणारा "राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार" २०२१ हा या वर्षीचा पुरस्कार डॉ. खांडे यांना २५ आगस्ट रोजी प्रधान करण्यात आला.
डॉ. प्रशांत खांडे हे मागील २० पेक्षा अधिक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्य करीत आहेत, त्यांनी आपल्या सामाजिक जिवनाचा प्रवास इंजिनीरिंग काॅलेज मध्ये तिसऱ्या या वर्षाला असतांना राजीवजी दिक्षीत यांच्या सोबत स्वदेशी बचाओ आंदोलन पासून सुरू केला. तसे लहान वयापासून सामाजिक क्षेत्रात काम आणि नेतृत्व गुण असल्यामुळे टीम काॅप्टन, क्लास माॅनिटर ते काॅलेज मध्ये प्रसिडेन्ड ऑफ मॅनेजमेनट असोसिएशन कमिटी अश्या संधी मिळाल्या. त्या नंतर त्यांनी काॅलेज जीवनातच प्रोग्रेसिव युथ क्लब ची स्थापना करून सामाजिक कार्यात सहभाग वाढवला.
त्यांनी आतापर्यंत अण्णा आंदोलन,बेटी बचाव आंदोलन, विविध आंदोलन, विविध सामाजिक संस्थांना मदत कार्य, ग्रामीण भागात युवकांना मोफत करियर आणि व्यवसाय मार्गदर्शन तसेच सामाजिक उद्योजकांना आणि सामाजिक नोकरी मेळावा हे त्यांनी सर्व महाराष्ट्रात सुरू केले. याची नोंद विविध माध्यमांनी घेतली आहे. असे उद्धार कृष्णाजी जगदाळे अध्यक्ष मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांनी काढले.
डॉ. प्रशांत खांडे यांनी लिहिलेले ३ पुस्तके लिहिली पण हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेली आहेत, त्या पुस्तकातुन त्यांनी नवे देशासाठी नेतृत्व कसे निर्माण होईल याचा विचार समोर मांडले आहेत. ते अखिल रयत सेवक क्रांतिकारी संघ आणि रयत सेवक एज्युकेशन अँड टिचभर असोसिएशन चे काम सांभाळत आहेत.
मागील २ वर्षापासुन ते स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांचे चेअरमन म्हणून काम बघत आहेत. त्याच्या नेतृत्त्वात फेडरेशन तर्फे राज्यस्तरीय सरपंच परिषद, राज्यस्तरीय पाणी परिषद, राज्यस्तरीय पालक परिषद बालक परिषद आणि राज्यस्तरीय बचत गट परिषद असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या अश्या कुशल नेतृत्व गुणामुळे त्यांना कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पध्दतीने २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी संस्थेतर्फे घेण्यात आला. त्यांना लिडर अवाॅर्ड झी टीव्ही असोसिएशन एम आरसी २४ लिडर अवार्ड २०१६, विवेकानंद युवा रत्न पुरस्कार २०१८, रंग अचीवर अवार्ड २०२०, नेलडा सन्मान २०१८, महापालक तर्फे सन्मान २०१९, पुणे कट्टा सन्मान, अशा बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी मिळवलेल्या पुरस्कार त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे.
डॉ प्रशांत खांडे यांना राज्यस्तरीय कुशल जननायक लोकगौरव पुरस्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 28, 2021
Rating:
