सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (२८ ऑगस्ट) : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे दिनांक २९ व ३० ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १०:३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. सोमवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हा संकुल समितीच्या बैठकीस शासकीय विश्रामगृह येथे उपस्थिती.
सकाळी १०:३० मनरेगा संबधी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे बैठक. सकाळी ११ वाजता जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे भेट, दुपारी वा.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र, यवतमाळ येथे भेट. दुपारी १२:३० वाजता डॉ.ए पी जे अब्दुल कलाम ग्रंथालय येथे भेट. दू.१ ते ३ शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन व राखीव. दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथून नागपूरकडे प्रयाण.
पालकमंत्री ना. भुमरे जिल्हा दौऱ्यावर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 28, 2021
Rating:
