सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२८ ऑगस्ट) : नाते संबंधाचा गैर फायदा घेत नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात उघडकीस आली आहे.मामाचं नातं असलेल्या नराधमाने आपल्याच अल्पवयीन भाचीवर जीवे मारण्याची धमकी देत सातत्याने अत्याचार केला. वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे अपमानित झालेल्या भाचीने अखेर विश प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पिडीतेच्या घेतलेल्या बयानामुळे मामाच्या दूष्कृत्याचे बिंग फुटले. मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी अशी ही घटना असून नात्याला कलंक लावणार्या मामा विरुध्द पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्याने मामा लागत असलेल्या नराधमाने लैगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय मुलगी आपल्या आजी सोबत राहत असलेल्या घरी राजुरा येथील रहिवासी असलेला 38 वर्षीय मामा आपल्या पत्नीसह रहायला आला. मागिल एक वर्षापासुन तो पिडीतेच्या घरीच रहात होता. मामा भाचीचं नातं असल्याने मुलगी त्याच्या सोबत मोकळेपणाने बोलायची. पण त्याच्या नियतीत खोट होती. एक दिवस मुलगी घरी एकटी असतांना त्याने संदीचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्ती केली. याबाबत कुणाला सांगितल्यास तिला जीवानिशी मारण्याची धमकी दिली. जिवाने मारण्याची धमकी देत तो तिच्यावर सतत अत्याचार करू लागला. अशातच तिला गर्भधारणा झाली. त्याने तिचा गर्भपातही करवुन घेतला. सततच्या अत्याचारामुळे अपमानित होऊन पिडीतेने 20 ऑगष्टला विश प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुलीचे बयाण घेतले असता हे वास्तव समोर आले.
26 ऑगष्टला पिडीतेने पोलिसांना दिलेल्या बयानात मामाने लैंगिक शोषण केल्याचे सांगितले. मुलीच्या बयानावरून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता नराधम मामाला अटक केली, व त्याच्या विरुध्द भादंवि च्या कलम 376 (2)(N), 506, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 च्या कलम 4,6,8, अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात राम कांडुरे करित आहे.
भाचीचे लैंगिक शोषण करणाऱ्या मामाला पोलिसांनी केले गजाआड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 28, 2021
Rating:
