अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी "शासकीय मोबाईल" केले जमा, १७ ऑगस्ट पासून राज्यव्यापी मोबाईल वापसी आंदोलन सुरुच

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (२८ ऑगस्ट) : शासनाच्या वतीने प्रकल्प कार्यालयातून अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्राचे काम ऑनलाईन पाठवण्यासाठी "शासकीय मोबाईल" देण्यात आले. सदर मोबाईल चांगल्या प्रतीचे नाहीत. असे अनेकदा सांगून सुद्धा प्रशासनाने लक्ष दिले नाही.
मोबाईल हँग होणे, गरम येणे, बंद पडणे, आपोआप डिसप्ले जातो यामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व आयटकने या आधी या प्रकाराबाबत आंदोलन करून सेविकांना होणारा नवीन मोबाईल द्यावा व त्यात मराठी भाषेतील अप्लिकेशन असावे यासाठी वारंवार निवेदन देऊन चांगल्या दर्जाचा मोबाईल देण्यात यावा ही मागणी केली जात आहे. परंतु शासन कानाडोळा करीत आहे.

आता मोबाईल वॉरंटी गॅरंटी ३१ मार्च २०२१ ला संपली असून बिघाड झालेल्या मोबाईल ला खर्च चार हजार ते पाच हजार रुपये येत आहे. हा भ्रूदंड सेविकांवर पडत आहे, या साठी १७ ऑगस्टपासून ही मागणी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकल्प कार्यालयाने दिलेला मोबाईल सर्व सर्कल मधील बालविकास कार्यालयात जमा करण्यात आले आहे. मात्र, सूचना देऊन ही अधिकारी हजार झाले नाहीत. आता नवीन मोबाईल दर्जेदार द्यावा व मराठी भाषेतील अप्लिकेशन असावी यासाठी आयटक च्या वतीने मारेगाव येथे आंदोलन करण्यात आले. कॉ. बंडू गोलर, प्रमिला मलकापुरे, पार्वती मोहुर्ले, आशा खामनकर, प्रभावती खोडे, ज्योती बोधाने यांच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी आयटक जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. दिवाकर नागपुरे, अंगणवाडी कर्मचारी युनियन जिल्हा अध्यक्षा सविता कट्यालमल, जिल्हा सचिव गया सावळकर, कोमल रिंगणे यांनी मार्गदर्शन केले. शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर २४ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय आयटक घेतला असल्याचे मत कॉ. नागतुरे यांनी मांडले. 
कुचकामी मोबाईल शासनाने परत घेऊन नवीन चांगल्या प्रतीचे मोबाईल देण्यात यावे, व बिघाड आल्यास त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी. महाराष्ट्रातील भाषा मराठी असल्याने यातील अनेक कर्मचाऱ्यांना इंग्रजीतून समजणे अवघड जात असून,लाभार्थी गट बदलणे किंवा वर्गवारी, दैनिक कामाची माहिती भरणे, यासाठी इतरांची मदत घेणे शक्य नाही. त्यामध्ये मराठी मातृभाषेतील अप्लिकेशन असावी या प्रमुख मागणी साठी आयटक च्या वतीने आंदोलन करण्यात आले. 
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी "शासकीय मोबाईल" केले जमा, १७ ऑगस्ट पासून राज्यव्यापी मोबाईल वापसी आंदोलन सुरुच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी "शासकीय मोबाईल" केले जमा, १७ ऑगस्ट पासून राज्यव्यापी मोबाईल वापसी आंदोलन सुरुच Reviewed by सह्याद्री चौफेर on August 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.