सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२७ ऑगस्ट) : चंद्रपूर तालुक्यातील माैजा किटाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार नामे नमु प्रल्हाद शेंडे यांचे दुकानातून धान्यांची उचल करण्यांस गावकऱ्यांनी चक्क! नकार दिला असुन, हे दुकान इतरत्र (स्वस्त धान्य दुकानदारांस) जाेडण्यांची मागणी समस्त गावकरी मंडळीनी एका निवेदनातून नुकतीच जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी चंद्रपूर यांचेकडे केली आहे. सादर केलेल्या निवेदनात त्या दुकानाच्या अनेक तक्रारींचा उल्लेख केला असून, या संदर्भात अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांनी लेखी तक्रारी नाेंदविल्या आहे.
उपरोक्त दुकान तातडीने दुसऱ्या दुकानदारांकडे जाेडले नाही तर जन आंदोलन छेडु असा इशारा देखील काहींनी एका निवेदनातुन दिला आहे. दरम्यान, किटाडी येथील गावकरी मंडळीने चंद्रपूर जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांकडे या निवेदनाच्या प्रति दिल्या असल्याचे व्रूत्त ऐकिवात आहे.
जिल्हा प्रशासन या बाबतीत कुठला निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.
स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करण्यास किटाळी ग्रामस्थांचा नकार !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 27, 2021
Rating:
