टॉप बातम्या

तोल जाऊन शेतकऱ्याचा मृत्यू


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२७ ऑगस्ट) : पराटीला फवारणी करण्यासाठी पाणी काढताना तोल जाऊन खोल असलेल्या विहिरीत पडुन एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रमोद काकडे (अंदाजे वय ४७) रा. कान्हाळगाव (वाई) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. प्रमोद हे कपाशी फवारणीला पाणी काढण्यासाठी विहीरी वर गेले असता पाणी काढतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्याचा  दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवार दि.२६ ऑगस्टला दुपारच्या दरम्यान घडली.

पाणी काढण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने ते ३० ते ३५ फूट खोल विहिरीमध्ये पडल्याने प्रमोद यांचा पाण्यात पडून दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने काकडे कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले. प्रमोद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post