मनसेचे चंद्रपूरात ढोल बजाओ आंदोलन, छोट्या गोविंदाने फोडली दहीहंडी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२७ ऑगस्ट) : महाराष्ट्र सरकारने हिंदू सणाच्या उत्सवांवर बंदी करून महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांवर अन्याय चालवलेला आहे, या संदर्भातील सरकारच्या धोरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी राज्यस्तरावर कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रात दहीहंडी कार्यक्रम होणारच व गोविंदा पथक दहीहंडी कार्यक्रमात सहभागी होणारच या विश्वासाने चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी चंद्रपूर जिल्ह्यात दहीहंडीचा कार्यक्रम व्हावा यासाठी कंबर कसली असून हिंदूच्या सण उत्सवांवरील बंदी सरकारने उठवून महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी दहीहंडी व गणेश उत्सवास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काल गुरुवारी दुपारी मोर्चा नेऊन छोट्या गोविंदाच्या हस्ते दहीहंडी फोडून सरकारच्या हिंदू सणावरील बंदी विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. मनसे तर्फे चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात हिंदूंचे अनेक सण आपण उत्सवात साजरे करीत असतो पण कोविडचे कारण समोर करून इथल्या हिंदूना आपली संस्कृती व परंपरा जोपासण्यासाठी मज्जाव केल्या जात आहे. येथे राजकीय मेळावे होतात, महाराष्ट्रात भाजपची यात्रा निघू शकते. भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा होऊ शकते. पत्रकार परिषदेत व्यक्तिगत अंतर पाळल्या जात नाही, मास्क लावल्या जात नाही, ते चालते तर मग हिंदूंच्या दहीहंडी व गणेश उत्सवावरच बंदी का? हे इथल्या आंधळ्या बहिऱ्या सरकारला कधी कळेल? आणि म्हणून आज हिंदूंच्या सण उत्सवावर लावलेली बंदी उठवावी याकरिता सरकारच्या विरोधात काल ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. 

आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेला अबाधित ठेऊन हिंदूंचे सर्व सण आणि उत्सव साजरे व्हावे यासाठी कार्य करतो आणि ही जबाबदारी येथील राज्यकर्त्याची आहे. त्यामुळे आमचा आवाज सरकार पर्यंत पोहचवून हिंदूंचे सण साजरे करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा दहीहंडीचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार अशी गर्जना करून मनसे पदाधिकाऱ्यांनी सरकारचा निषेध केला.
हे ढोल बजाओ आंदोलन मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी व जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांच्या नेत्रूत्वात करण्यात आले.

या वेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव किशोर माडगूलवार, मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे. तालुका अध्यक्ष विवेक धोटे, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, श्रीकांत नूने, मनोज तांबेकर, पियुष धूपे, राहुल यदुवंशी, कृष्णा गुप्ता, प्रवीण शेवते, करण नायर, कोमल ठाकरे,सुरज भामरे, अक्षय चौधरी, राकेश बोरीकर, नितेश जुमडे, नितीन पेंदाम, जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्षा वाणी सदालावार, विभाग अध्यक्षा वर्षा भोमले, तुषार येरमे, शैलेश सदालवार, सचिन गुप्ता, राजेंद्र वर्मा, सचिन चिंचुलकर व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मनसेचे चंद्रपूरात ढोल बजाओ आंदोलन, छोट्या गोविंदाने फोडली दहीहंडी मनसेचे चंद्रपूरात ढोल बजाओ आंदोलन, छोट्या गोविंदाने फोडली दहीहंडी Reviewed by सह्याद्री चौफेर on August 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.