...तर पंधरा दिवसापासून आरोग्य सेवक 'इकडे' फिरकला नाही, महागाव तालुक्यात टायफाईड मलेरिया डेंगू सदृश्य रोगाचे वाढले थैमान
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (२७ ऑगस्ट) : तालुक्यात गेल्या काही दिवसापासून टायफाईड मलेरिया डेंगू सदृश्य रोगाचे थैमान आहेत. अशावेळी फुलसावंगी येथील पी एच सी मधील आरोग्य सेवक गावोगावी जाऊन घरोघरी भेट देणं आवश्यक असतांना कासारबेहळ, वरोडी, टेंबी व सेवानगर या गावाकडे आरोग्य सेवक फिरकत नसल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवे करिता सरकारने ग्रामीण भागातील आरोग्य सदृढ राहावे या दृष्टीने आरोग्य सेवकाची नेमणूक केली आहे. परंतु उबाळे आरोग्य सेवक उंटावरून बसून शेळ्या हाकलण्याचे काम करत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहे. गावात टायफाईड मलेरिया डेंगू सदृश्य आजार पसरत आहे. आणि याकडे एकट्या फक्त गावातील आशा वर्कर च्या भरवश्यावर भागवीने चालू आहे. गोळया घेऊन यायचं आणि आशा वर्करकडे देऊन निघून जायचं एवढंच काम आरोग्य सेवकाचे फक्त आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उबाळे आरोग्य सेवक यांचे मुद्दाम गावातील आजारांकडे लक्ष नसल्याने प्रमाण वाढत असल्याचे बोंबाबोंब आहे गेल्या पंधरा दिवसापासून उबाळे वरील गावाकडे फिरकले नाही. या गंभीर विषयाकडे लोक प्रतिनिधीनी गावागावात कॅम्प लावावे अशी जनतेतून मागणी होत आहे. तसेच याबाबत पंचायत समिती माजी सदस्य संदीप ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे यांना आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, महागांव तालुका आरोग्य अधिकारी जब्बार पठाण यांच्याशी चर्चा करून लगेच कॅम्प लावण्यात येईल असे सांगितले. गर्भ श्रीमंत हे खासगी दवाखान्यात आपला इलाज करून येतात. परंतु गोरगरीब मजूर वर्गाच्या आरोग्याचे काय? त्यांना फुलसावंगी पी एच सी ला जाण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सोय नसल्याने आजार अंगावर काढावे लागत आहे. परिणामी या गंभीर विषयाची दखल घेण्यात यावी अशी जनतेमधून शिमग्याची ओरड आहे.
...तर पंधरा दिवसापासून आरोग्य सेवक 'इकडे' फिरकला नाही, महागाव तालुक्यात टायफाईड मलेरिया डेंगू सदृश्य रोगाचे वाढले थैमान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 27, 2021
Rating:
