सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
केळापूर, (२७ ऑगस्ट) : डॉ. किशोर मोघे यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, दिशा महिला महासंघ व ग्रामसभा महासंघ संयुक्त विध्यमाने पांढरकवडा येथील जीद्देवार भवन येथे रानभाजी महोत्सव दिनाक २६ ऑगष्ट २०२१ रोजी घेण्यात आला.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अंतर्गत ग्रामसभांना निस्तार, वनौपज व संवर्धन व्यवस्थापनाचा हक्क मान्य झाले आहे. त्यानुसार ग्रामसभंनी संवर्धन व्यवस्थापन आराखडे तयार केलेत. त्यानुसार ग्रामसभा वनक्षेत्राचे संवर्धन, आणि व्यवस्थापन करीत आहे. वनौपजमध्ये सध्या जंगलातील रानभाज्या संकलित करणे आणि त्याचा वापर करणे बाबत ग्रामसभा प्रतिनिधी पुढे येत आहे. आदिवासी समुदाय परंपरेने रानभाजी उपयोग करीत आहे. ह्या रानभाज्या बाबत माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचावी व रानभाज्या त्यांच्या खाण्यात जाव्यात, त्याचे औषधी गुणधर्म माहित व्हावे याकरिता दिनांक रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते.
या रानभाजी महोत्सवाचे अध्यक्ष स्थान श्रीमती वच्छला मडावी अध्यक्ष दिशा महिला महासंघ यांनी भूषविले. श्रीमती अर्चना मेश्राम व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ यांनी रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून विजय तळणीकर ए.सी.एफ. वनविभाग पांढरकवडा, पवार साहेब नियोजन अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा, गणेश आत्राम तुलाका व्यवस्थापक महारष्ट्र राज्य जीवन्नोंतो अभियान पांढरकवडा, मन्सूर खोरासी दिलासा संस्था, अमित कुलकर्णी नवी उमेद संस्था, सुनीता सातपुते, शीतल ठाकरे, मोहन जाधव ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांनी मार्गदर्शन केले. श्रीकांत लोडम यांनी संचालन व प्रास्ताविक केले.
या महोत्सवामध्ये झरी जामणी, मारेगाव, केळापूर आणि घाटंजी तालुक्यातील सामुहिक वनहक्क प्राप्त गावातील १२० महिला आपल्या जंगलातील १७ प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले होते. यामध्ये त्यांनी या रानभाज्या कधी येतात, यातील औषधी गुणधर्म, या भाज्या कशा तयार कराव्यात, याची रेसिपी याची स्वतः महिलानी मांडणी केली. वेगवेगळ्या भाज्यांचे प्रदर्शन आणि महिलांनी स्वतः शिजवून तयार केलेल्या भाज्या प्रदर्शनात मांडल्या. पाहुण्यांनी या रानभाज्यांचा आस्वाद घेतला.
आज बहुतेक लोकांना एक किंवा दोन रानभाज्या पलीकडे भाज्या माहित नव्हत्या. पण आज १७ प्रकारच्या रानभाज्यांची माहिती हि अप्रतिम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याच्या अधिकाऱ्यांनी शुभेच्चा दिल्या. असे नाविन्यपूर्ण उपक्रम संस्था आणि शासन मिळून नियमित व्हावेत अशी अधिकारी आणि सहभागी व्यक्तीनी अपेक्षा व्यक्त केली सहभागी महिलांचे भरभरून कौतुक केले.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट अंतर्गत रानभाजी महोत्सव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 27, 2021
Rating:
