सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
पांढरकवडा, (२७ ऑगस्ट) : जेष्ट नागरिक हे समाजाचे महत्वपूर्ण घटक असून, त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी जागतिक जेष्ट नागरिक दिनाचे औचित्य साधत गोदावरी अर्बन ने जेष्ठ नागरिकांकरिता पाऊण टक्के (०.७५%) वाढीव व्याजदर दिले आहेत. त्यासोबतच पाचही राज्यातील शाखांच्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पांढरकवडा शहरातील विविध जेष्ट नागरीकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील, अध्यक्षा सौ. राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनात गोदावरी अर्बनने जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून त्यांच्याकरिता अधिक व्याजदराची योजना अंमलात आणली आहे.
या प्रसंगी पांढरकवडा शाखेच्या वतीने सर्व सन्माननिय सर्वश्री बाबरावजी पडोळे, वसंतरावजी नव्हाते, यादवराव केशट्टीवार, विष्णुपंत पाटील, मनोहरराव गंगशेट्टीवार, गिरीधर राजगडकर इत्यादी जेष्ठांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी पांढरकवडा शाखा व्यवस्थापक संतोष आदे, उपव्यवस्थापक सचिन अग्रवाल, अधिकारी जयंत पवार, कनिष्ट अधिकारी उमेश बुर्रेवार, आशीष पंदेनवार, विनोद पेटरामवार, अमोल पोतगंटवार, परीक्षित एलकर, दैनिक प्रतिनिधी किशोर मालिकर, मारोती भानारकर इत्यादी उपस्थित होते.
गोदावरी अर्बनच्या वतीने जेष्ठ नागरिक दिन साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 27, 2021
Rating:
