टॉप बातम्या

चंद्रपूरात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने "दे धक्का" आंदोलन

सह्याद्री न्यूज | ऋतुजा साेनवाने 
चंद्रपूर, (०६ ऑगस्ट) : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सोमवार दि. ९ ऑगष्टला दुपारी १ वाजता महानगर पालिका सत्ताधिकाऱ्यांनी केलेल्या घाेटाळ्यांचा संदर्भात दे धक्का आंदोलन आयोजित करण्यांत आले आहे.
सदरहु आंदोलन चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा चांदा यंग ब्रिगेडचे सर्वेसर्वा किशाेर जाेरगेवार यांचे नेत्रूत्वाखाली स्थानिक गांधी चाैकातील मनपा कार्यालयासमाेर हाेत आहे. तशा आशयाचे होर्डिंग, बॅनर शहरातील अनेक भागात लागल्याचे दिसून आले आहे.
त्यामध्ये अमृत योजना पाणी घोटाळा, आझाद गार्डन घोटाळा, कचरा घोटाळा व कोरोना घोटाळा चा प्रामुख्याने उल्लेख असून, चंद्रपूरात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने "दे धक्का" आंदोलन होत असलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधत आहे.

Previous Post Next Post