तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला रिपरिप पावसात उत्स्फुर्त प्रतिसाद


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे 
कोरपना, (०७ऑगस्ट) : तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना आजाराचा प्रभाव लक्षात घेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नयेत म्हणून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील कारवाई, कोल्हापूर, इरई, कोराडी, ऐकोडी या ग्रामीण गावात कोवीड -19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. पुर्वीपेक्षा लसीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. कोरपना येथील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर कवठाळा यांचे सौजन्याने करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. रमेश बावने यांनी गावामध्ये लसीकरण घेण्याची प्रशासनाच्या नियोजीत सहकार्य करत डॉ. बावने यांनी या रिपरिप पावसात पुर्णनियोजित कोविड -19 लसिकरण शिबिराचे आयोजन सांगोळा कारवाई सरपंच सौ.संजना सचिन बोंडे आणि येथील पाचही गावातील सरपंच यानी अथक परिश्नमात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने लसीकरण करण्यात आले होते व या लसीकरण शिबिराचा लाभ समस्त गावात ‌या लसिकरण शिबीरात ग्रामस्थानी लसिकरण करून घेतले.

या लसिकरण शिबीर आयोजन करण्यासाठी डॉ. वैद्यकीय अधिकारी रमेश बावने, (CHO) अश्विनी राहुलगडे, सिस्टर योगीता पत्रे, झाडे सिस्टर, ढवस सिस्टर, डांडेकर, शारदा गादम, कोरडे, कुळमेथे सिस्टर, मोटघरे, शेळके , कातकर सिस्टर, देवगडे सि,(HO) खामणकर, वाघमारे, शिंदे, ‌(BF) संगीता वानखेडे आणि अंगणवाडी सेविका व सर्व आशावर्कर उपस्थित होते,    
यावेळी सरपंच, उपसरपंच आदीनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला रिपरिप पावसात उत्स्फुर्त प्रतिसाद तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला रिपरिप पावसात उत्स्फुर्त प्रतिसाद Reviewed by सह्याद्री चौफेर on August 07, 2021 Rating: 5
Powered by Blogger.