जिल्ह्यातील शेकडो युवकांना न्यायाची प्रतीक्षा


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
यवतमाळ, (०७ ऑगस्ट) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण मुला-मुलींना नोकरी लावून देतो याकरता लाखों रुपये उकळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश नुकताच झालेला आहे. अनेक युवकांना वेगवेगळ्या नावाखाली फसवणूक केल्या गेलेले आहे.

सिक्युरिटी लावून देतो म्हणून त्यांच्या कडून पैसे घ्यायचे आणि त्यांना फसवायचे हा धंदा करणारे रॅकेट आहे. त्यांचा पडदा पास झाल्यामुळे मुंबई चे माजी पोलीस उपायुक्त मा. ऍड. धनराज वंजारी दिनांक ६ ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे रेस्ट हाऊसला आले होते. त्यावेळी बोलतांना, जे जे सुशिक्षित बेरोजगार ज्यांना फसवल्या गेले. ज्यांना ऑनलाईन पैशाच्या जागी फसवल्या गेले. ज्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून फसवले गेले. त्या सर्वांच्या समस्या एकूण त्या शासन दरबारी प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याकरिता एडव्होकेट धनराज वंजारी माजी पोलीस उपायुक्त मुंबई, सोबतच प्राध्यापक रमेश पिसे यवतमाळ आले असतांना, बैठकीत पुढे म्हणाले, ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी आपल्या कागदपत्र घेऊन पोलीस स्टेशन रिपोर्ट करावे. कुठे कुठे पैसे दिले, कोणाच्या माध्यमातून दिले, त्या सर्व बाबी रिपोर्ट मध्ये टाकावे असे मार्गदर्शन करण्यात आले.
            (मान्यवरांशी चर्चा करताना युवती)

यावेळी जिल्ह्यातील शेकडो च्या वर मुलं मुलींची बैठकीला उपस्थिती होती. त्यांनी आपापल्या समस्या व तक्रारी मांडल्या. या प्रसंगी बोलतांना वंजारी म्हणाले की, आपल्या पोलीस स्टेशन मधून न्याय मिळाला नाही तर जिल्हा अधीक्षक यांच्या कडे दाद मागावी त्यानंतर शासन व सीआयडी चौकशी लावू. जर आपली तक्रार ठाण्यात घेत नसेल तर सरळ एडवोकेट महेश माहूलकर सर यांना संपर्क साधावा, याबाबत तुम्हाला ते मदत करतील असे सांगितले.

त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना आता न्याय मिळतील आणि फसवेगिरिंना चाप कधी बसतील याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. 
जिल्ह्यातील शेकडो युवकांना न्यायाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेकडो युवकांना न्यायाची प्रतीक्षा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 07, 2021 Rating: 5
Powered by Blogger.