सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (०६ ऑगस्ट) : शहरातील प्रभाक क्र. ४ मधील घराच्या दरवाजात उभी असलेल्या विवाहित महिलेला एका ३५ वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशन देण्यात आली. सदर घटना दि.५ ऑगस्ट रोज गुरुवारला रात्री ९:०० वाजताच्या सुमारास घडली. मात्र, संशायित आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे की, मारेगाव शहरातील प्रभाग क्र. ४ मधील पिडीत महिला घराच्या दरवाजात उभी असतांना प्रभाग क्र. ५ मधील संशायित आरोपी विकास मोहितकर (३५) हा महिलेच्या घराच्या दारावर येवून पीडित महिलेला अश्लील शिवागीळ करत शरीर संबंधाची मागणी करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
पिडीत महिलेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या प्रकारची माहिती सांगून आरोपी विरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार आरोपी विकास मोहितकर यांचेवर भांदवी कलम ३५४,३५४(अ)(१),(२),(४)३२३,५०६ मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा विनयभंग : मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 06, 2021
Rating:
