सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी (०६ ऑगस्ट) : झरी तालुक्यातील गाडेघाट गावात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका मनिषा अशोक बरपटवार यांचा पती अंगणवाडी च्या कामात हस्तक्षेप करीत येथील पालकांना उद्धट भाषा बोलून दमदाटी करतात, अशी तक्रार झरी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनातून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह गावाकऱ्यांनी केली आहे.
दिनांक २ ऑगस्ट रोजी ग्रा.पं.सदस्य रमेश दोरशेट्टीवार हे अंगणवाडी सेविका यांना मुलांच्या पोषणआहार व मुलांचे पैसे आले का याबाबत विचारपूस केली असता, लिंगटी रहिवाशी अंगणवाडी सविकेचा पती अशोक बरपटवार यांनी गावात येऊन रमेश दोरशेट्टीवार यांच्याशी वाद घातला, त्यावेळी गावातील विठ्ठल मुके हा मध्यस्ती करिता आला असता त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत विठ्ठल मुके यांनी पोलीस स्टेशन ला रीतसर तक्रार दिली आहे. परिणामी गावातील लोकांना धमकावणे, अंगणवाडी चा येणारा माल गावात न उतरवता लिंगटी येथे उतरवणे, संबंधित अंगणवाडी सेविका गावातील लोकांना उडवा उडवीची उत्तरे देऊन दिशाभुल करणे, याबाबत गावातील लोकांनी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मा.आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, मा. मुख्य अधिकारी साहेब जि.प.यवतमाळ, मा.पर्यवेक्षक मॅडम एका. बाल. प्र. कार्यालय झरी जामणी यांच्या कडे तक्रार सादर केली आहे. सदर तक्रार ०५/ऑगस्ट/२०२१ रोजी करण्यात आली आहे.
गाडेघाट अंगणवाडी सेविका यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशा प्रकारे लेखी स्वरूपात तक्रार सादर केली असता, येत्या काही दिवसांत अंगणवाडी सेविका यांना निलंबित करण्यात आले नाही तर आमच्या पाल्यांना अंगणवाडी मध्ये न पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला असून, या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करावी व चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुढे निवेदनातून ईशारा देण्यात आहे की, कारवाई न झाल्यास आम्ही गावकरी उपोषणास बसण्यात येईल.
निवेदनात सह्या करणारे देविदास शालिक तुडमवार, श्रीनिवास गंभीर बरपटवार, विकास दादाजी पावर, राहुल रमेश दोरशटवार, दीपक आनंदराव गाताडे, विश्वास गंभीर बरपटवार, राहुल विठ्ठल मुके, महेश अडलू तीपनवार,अनिल तुकाराम नागपुरे असे गावाकऱ्यांची नावे आहेत तर ग्रामपंचायत सदस्य ईश्वरी गुरुप्रकाश राजगडकर (सरपंच), गजानन काळे (उपसरपंच), रमेश दोरशटवार, मनिषा भोयर, शाईना शेख, लक्ष्मीबाई मंचलवार, भुमन्ना म्याकलवार यांच्या ही सह्या आहे.
अंगणवाडी सेविकेला निलंबित करा - गाडेघाट येथील गावकऱ्यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 06, 2021
Rating:
