टॉप बातम्या

पोलीस सहाय्यक उप निरीक्षक पदी राजाभाऊ नागरगोजे यांची निवड तर पाणी पुरवठा सुपरवायझर पदी अमोल बागलाने रुजू

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (०६ ऑगस्ट) : पोलिस दलात सहाय्यक पोलिस उप निरीक्षक पदी निवड झाल्याने,सहाय्यक पोलीस निरीक्षक, वसुदेव मिसाळ, राजाभाऊ नागरगोजे, यांचा सत्कार करताना, तसेच नगर पालिका पाणी पुरवठा विभागाचे सुपर वायझर दुधाळ साहेब याचं सेवानिवृत्ती निमित्त तसेच त्यांचा कार्यभार स्विकारणारे अमोल बागलाने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी, पोलीस उप.निरीक्षक विजय जाधवर, मराठी पत्रकार संघनटनेचे विभागीय सचिव विशाल साळुंके, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, सहकारी आबा सावंत, शंकर काशीद, तांबे सर, रिपोर्टर चे मजीद शेख, शहर वाहतूक शाखेचे मोहम्मद आवेज, चिंतामणी शिंदे, हे उपस्थित होते.

कार्यक्रम चे सूत्र संचालन पोलीस उप निरीक्षक जाधवर यांनी केले व समारोप शहर वाहतूक शाकेचे मोहम्मद आवेज यांनी केला.
Previous Post Next Post