बॉलिवूडचा खिलाडी अक्षयच्या बेल बॉटमची बॉक्स ऑफिस वर जादू


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मुंबई, (२२ ऑगस्ट) : बॉलिवूड चा खिलाडी अक्षय कुमार आणि वाणी कपूर चा बेल बॉटम हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. लॉकडाऊन नंतर चित्रपट गृहमध्ये रिलीज होणारा 'बेल बॉटम' हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्यादिवशीच चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय च्या बेल बॉटम दुसऱ्याच दिवशी २.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ओपनिंग ला चित्रपटाने ३ कोटी रुपयांची कमाई केली होती. दोन दिवसात चित्रपटाने जवळपास ५.५० कोटी रुपयांची कमाई केली. विकेंड ला जास्त कमाई करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. बेल बॉटम या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळला आहे. कोरोना काळात बेल बॉटमच्या निर्मात्यांनी चित्रपटाला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तर अशा कठीण काळात चित्रपटाला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक सेलिब्रेटिंनी निर्मात्यांचे व कलाकारांचे कौतुक केले आहे. अक्षय कुमार च्या बेल बॉटम या चित्रपटात त्याच्या सोबत लारा दत्ता, वाणी कापूर आणि हुमा कुरेशी देखील आहे. हा चित्रपट १९ ऑगस्ट ला प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाची निर्मिती निर्माते जॅकी भगनानी आणि दिपशिखा देशमुख यांनी केली आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयच्या बेल बॉटमची बॉक्स ऑफिस वर जादू बॉलिवूडचा खिलाडी अक्षयच्या बेल बॉटमची बॉक्स ऑफिस वर जादू Reviewed by सह्याद्री चौफेर on August 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.