कवठी गावातील तापाची साथ त्वरीत आटोक्यात आणा - जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संध्या गुरनुले यांचे आरोग्य विभागाला निर्देश
सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (२१ ऑगस्ट) : सावली तालुक्यातील कवठी गावात पसरलेली साथ तात्काळ आटोक्यात आणण्यासाठी गावात आरोग्य शिबिर लावण्यात यावे, गावात जंतूनाशक फवारणी करा, औषध साठा तात्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील कवठी उपकेंद्राला संध्या गुरनुले यांनी आज भेट दिली. अधिकार्यांसह त्यांनी गावातील समस्यांचा आढावा घेतला. ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी गावात तापाची साथ असल्याची महिती दिली. लागलीच उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी व ग्राम पंचायत कमेटीची बैठक बोलावली. भ्रमणध्वनीद्वारे आजपासून गावातील नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करा, गावात जंतूनाशक फवारणी करून औषध साठा उपलब्ध करा, गवातील पाण्याचे नमुणे तपासा, नाल्यांची तात्काळ स्वच्छता करण्याचे निर्देश गुरनुले यांनी दिले. लागलीच आरोग्य विभागाची चमु गावात दाखल झाली असून, तपासणी, स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे.
यावेळी डॉ. देवगडे, कांबळे, छाया शेंडे, कांता बोरकुटे, विलास बट्टे, देवराव चिताडे, खोजेंद्र येलमुले आदींची यावेळी उपस्थिती होती.
कवठी गावातील तापाची साथ त्वरीत आटोक्यात आणा - जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संध्या गुरनुले यांचे आरोग्य विभागाला निर्देश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 21, 2021
Rating:
