चक्क! शेड मधून १३ बकऱ्या चोरून नेल्या


                       (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२१ ऑगस्ट) : आज २१ ऑगस्टच्या पहाटे अज्ञातांनी १३ नग बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली असून, जवळपास १ लाखाच्या वर किमतीच्या बकऱ्या असल्याचे बोलल्या जात आहे.
विजय नामदेव किन्हेकर (६२) हे मारेगाव-वणी रोडवरील पेट्रोल पंप जवळ आपल्या शेतामध्ये च  कुटुंबासह राहतात. त्यांच्याकडे ७ बकऱ्या व ६ बकरे  एकूण १३ नग शेळ्या असून राज्य मार्गांलगत टीनाच्या शेड मध्य बकऱ्या होत्या, पहाटे २ वाजेच्या दरम्यान, विजय यांना लघुशंकेसाठी जाग आल्याने उठले तर, बकऱ्या ओरडत आहे म्हणून तिकडे जाऊन बघितले असता, अज्ञात चोरटे चारचाकी सीटर वाहनात बकऱ्या टाकत होते. किन्हेकर यांनी चोर चोर म्हणून आरडा ओरड केली मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे वाहन घेऊन पसार झाले. याबाबत विजय यांनी मारेगाव पोलिसांना माहिती दिली. मालकाच्या तक्रारी वरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
चक्क! शेड मधून १३ बकऱ्या चोरून नेल्या चक्क! शेड मधून १३ बकऱ्या चोरून नेल्या Reviewed by सह्याद्री चौफेर on August 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.