गोदावरी अर्बनच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (२१ ऑगस्ट) : जेष्ठ नागरिक हे समाजाचे महत्वपूर्ण घटक असून त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी जागतिक दिनाचे औचित्य साधत गोदावरी अर्बनने नागरिकांसाठी  पाऊण टक्का(०.७५) वाढीव व्याजदर दिले आहे.त्यासोबतच पाचही राज्यातील शाखेमध्ये सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आले आहेत.
    
याप्रसंगी वणी शाखेच्या वतीने ओमप्रकाशजी खुराणा, प्रमोदजी गादेवार, दत्तात्रयजी सुरावार, शंकरलालजी बंका, सुरेशजी बाकडे, पुंडलिकजी मत्ते यांचा सत्कार करण्यात आला. गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनात गोदावरी अर्बनने  जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पाऊण टक्के (०.७५) अधिक व्याजदराची योजना अंमलात आणली आहे. जेष्ठ नागरिक आयुष्यभर काबाडकष्ट करीत आपल्या वृद्धपकाळातील गरजां भागविण्यासाठी जमापुंजी जमा करीत असतात व निवृत्तीनंतर ती रक्कम बँकेत ठेऊन त्यावरील येणाऱ्या व्याजाच्या रक्कमेत आपला उदरनिर्वाह करीत असतात त्यांच्या या गरजेची दखल घेत गोदावरी अर्बनने त्यांच्यासाठी विशेष योजना आखली आहे.
    
संस्था कायमच जेष्ठ नागरिकांचा सन्मान करत असते, जागतिक महामारी कोरोना काळात देखील संस्थेने आपल्या जेष्ठ ठेवीदारांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेत घरपोच सेवा दिली आहे. इतकेच नव्हे तर वर्षभर पाचही राज्यातील शाखांच्या माध्यमातून त्यांच्या परिसरात असलेल्या जेष्ठ नागरीक कट्टा, संघटना यांच्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यासोबतच परिसरातील वृद्धाश्रमात मोफत नेत्र तपासणी, आरोग्य शिबीर, बैठकीचे बाकडे, पिठाची गिरणी, कॉट, रेफ्रिजरेटर, अन्न धान्य अशा त्यांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू संस्थेच्या माध्यमातून विविध दिनाचे औचित्य साधून दाईत्वाच्या उदार भावनेतून देण्यात येते.
    
यावेळी शाखा व्यवस्थापक अनिरुद्ध पाथ्रडकर, असिस्टंट मॅनेजर सुनील चिंचोळकर, ऑफिसर दीपक मत्ते, ज्युनिअर ऑफिसर सुरज चाटे, सब स्टाफ जयवंत ओचावार आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गोदावरी अर्बनच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा गोदावरी अर्बनच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.