सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
यवतमाळ, २१ ऑगस्ट
महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाज्योती मार्फत ओबीसी, एसबीसी, एन टी व्हीजे एसबीसी च्या दहा हजार विद्यार्थ्यांसाठी एम एस सी आय टी आयआयटी २०२१ ते २०२३ परीक्षांसाठी मोफत दोन वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यासाठी महाज्योती मार्फत अर्ज मागविण्यात येत आहे २५ ऑगस्ट शेवटची तारीख ठरविण्यात आली आहे.
यावर्षी दहावी पास झालेले विद्यार्थी यांना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. व एम एस सी आय टी आय टी. परीक्षा ची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना मी जून महिन्यात अभ्यास सुरू करणे गरजेचे असते. कारण या विद्यार्थ्यांना मार्च-एप्रिल २०२३ मध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे खासगी वर्गात हा परीक्षण कार्यक्रम जवळपास २२ ते २४ महिन्यांचा असतो तेव्हा प्रशिक्षण वर्गाला प्रचंड उशीर झालेला आहे सदर प्रशिक्षण तात्काळ सुरू करावी याकरता भारतीय पिछडा (ओबीसी) संघटन व ओबीसी जनमोर्चाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विजय वडेट्टीवारओबीसी कल्याण व बहुजन विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, लक्ष्मीकांत लोळगे, रामेश्वर कपाट, शशीकांत लोळगे, रविंद्र कोल्हे, रवी नागरीकर, अनील जयसिंगपूरे, विनोद इंगळे, विठ्ठलराव नागतोडे, अजय रहाटे, आकाश जुनघरे, पंकज सातपुते गजानन चौधरी, मोरेश्वर गुरनुले, विशाल वाघाडे, विजय मालखेडे .आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.
महाज्योती मार्फत एमएससीआयटी नीट आयआयटी जे डबल इ चे प्रशिक्षण तात्काळ सुरू करा - ओबीसी बांधव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 21, 2021
Rating:
