नाळवंडी नाका येथे आम आदमी पार्टीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू


बीड, (०८ ऑगस्ट) : नाळवंडी नाका येथे आम आदमी पार्टीच्या वतीने ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये पॅड बीड ते नाळवंडी रोडचे काम जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या २०११ पासून बीड शहरातील नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला, त्या भागाचा विकास व्हावा यासाठी आम आदमी पार्टी जन आंदोलन सुरु केले आहे.  जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल असे, आम आदमी पार्टीचे संघटनमंत्री ज्ञानेश्वर राऊत यांचनी माहिती दिली. 

दरम्यान राऊत यांच्या नेतृत्वात या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहे.
यावेळी सर्व बीड जिल्ह्याची 'आप' ची टीम त्यांच्यासोबत सहकार्याची भूमिका निभावत आहे.

यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष अशोक येडे, रामधन जी जमाले, सचिव सय्यद सादेक, शहर प्रमुख कैलासचंद पालीवाल व समस्त गावकरी आंदोलनात सामील होते.
नाळवंडी नाका येथे आम आदमी पार्टीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू नाळवंडी नाका येथे आम आदमी पार्टीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू Reviewed by सह्याद्री चौफेर on August 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.