ग्रामपंचायत भवन, भाजयुमो शाखेचे लोकार्पण व कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळा संपन्न


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (०८ ऑगस्ट) : भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना तालुक्यातील नारंडा येथे ग्रामपंचायत कार्यलय लोकार्पण, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शाखेचे लोकार्पण, कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळा घेऊन संपन्न झाला.

सामाजिक व राजकीय जीवनात कार्य करीत असताना आपण समाजतील अंतीम घटकांसाठी झटले पाहिजे, तसेच आशिष ताजने हे नेहमी विकासकामांसाठी झटत असतात, ग्रामपंचायत भवन हे लोकांच्या समस्या सोडविण्याचे प्रभावी माध्यम असले पाहिजे व ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरिकांचे समाधान झाले पाहिजे. आपल्या तालुक्यातील विविध प्रकारचे विकासकामे मार्गी लागले पाहिजे म्हणून नेहमी पाठपुरावा असते म्हणून जनतेच्या कल्याणासाठी झटणे हीच ईश्वरसेवा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी केले.
    
आशिष ताजने यांनी मागणी केल्यानुसार नारंडा येथील सामजिक सभागृहा समोर पेव्हर ब्लॉक व किचन शेड साठी निधी मंजूर करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी केली. व ग्रामपंचायत भवनाच्या फर्निचरसाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संध्याताई गुरनुले, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, नारंडा सरपंच अनुताई ताजने, भाजपा जेष्ठ नेते सुरेश केंद्रे, संजय मुसळे, माजी सरपंच वसंता ताजने, राजुरा नगरसेवक राधेश्याम अडानिया, गडचांदुरचे नगरसेवक रामा मोरे, अरुण डोहे, गडचांदुर भाजपा शहर अध्यक्ष सतिश उपलंचेवार, भाजपा युवा नेते निलेश ताजने, भाजपा जिल्हा सचिव विशाल गज्जलवार, तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, नगरसेवक अमोल
आसेकर, भाजयुमो जिल्हा सचिव ओम पवार,भाजयुमो राजुरा तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो कोरपना तालुका अध्यक्ष रोहन काकडे, डॉ.मुरलीधर पिपळशेंडे, पावडे गुरुजी, विजय पानघाटे, शशिकांत आडकीने, वासुदेव आवारी, नारंडा उपसरपंच बाळा पावडे, लोणी उपसरपंच अविनाश वाभीटकर, शेरज सरपंच अरविंद तिरानकर उपस्थित होते.
     
'जो कार्यकर्ता लहान वयापासून संघर्ष करून विकासकामे करत असतो तोच जनतेच्या मनातील सर्व प्रश्न सोडवू शकतो'. तसेच निवडणूकीतील पराभव हा पराभव नसून तो आपल्याला आणखी समाजाप्रती कार्य करण्याची प्रेरणा आणि ताकत देत असते असे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले.
     
भारतीय जनता पार्टीमध्ये माजी वित, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी आमदार एड.संजय धोटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांनी कोरपना तालुक्यात अनेक विकासकामे मंजूर करण्याचे कार्य त्यांनी केले,तसेच येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीसाठी आपण अधिक सक्षमपणे काम करू असे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सांगितले.

तसेच आशिष ताजने हे क्षेत्रातील गोरगरीब जनतेच्या सर्व प्रश्नांच्या सोडवूक करण्यासाठी सतत प्रयत्नरथ असतात,व जे विकासकामे करतील जनता जाती पाती, धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांना साथ देतील असे प्रास्तविक भाषणात पोलीस पाटील नरेश परसुटकर यांनी सांगितले.
  
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हेपट आणि आभार प्रदर्शन भाजयुमो जिल्हा सचिव ओम पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय तिखट, प्रवीण हेपट, सत्यवान चामाटे, अनिल मालेकर, अनिल शेंडे, भिकाजी घुगुल, अरुण निरे, महेश बिलोरिया, मारोती शेंडे, गजानन चतुरकर, अरविंद खाडे, हर्षल चामाटे यांनी परिश्रम घेतले.
ग्रामपंचायत भवन, भाजयुमो शाखेचे लोकार्पण व कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळा संपन्न ग्रामपंचायत भवन, भाजयुमो शाखेचे लोकार्पण व कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळा संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on August 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.