सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (०८ ऑगस्ट) : महागाव तालुक्यातील काळी दौलत, कासोळा, कौडगाव या वनविभागाच्या क्षेत्रात अनोळखी इसमानी अकरा मृत बैल आणून टाकले.
त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतशिवारात शेतकरी दिवसभर काम करताना दिसतात. त्यामुळे काळी यापासून ५० मिटर अंतरावर टाकण्यात आले असून, मृत बैलांची दुर्गंधी पसरल्याने शेतकर्यांना काम करणेही अवघड झाले आहे.
या प्रकाराबद्दल संदीप जाधव, आकाश पवार, पोलिस पाटील अरविंद जाधव, किशोर राठोड, गौरव राठोड यांनी संताप व्यक्त केला आहे.
अकरा मृत बैल काळी दौल- कासोळा शिवारात टाकल्याने पसरली दुर्गंधी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 08, 2021
Rating:
