आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा विद्यार्थीनिवर शारीरिक अत्याचार, गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम दिला चोप


                        (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (०८ ऑगस्ट) : शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना यवतमाळ तालुक्यातील बेलोरा जिल्हा परिषद शाळेत घडली. एका विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम चोप दिला आहे.

गावकऱ्यांच्या तावडीतून पोलिसांनी शिक्षकाला सोडवून रुग्णालयात दाखल केले. अरुण राठोड (५१), रा. जवळा असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचे कृत्य केले.

सदर शिक्षक विद्यार्थीनीला चांगले गुण कसे मिळवायचे या आमिषाने शाळेत थांबवून ठेवायचा. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा विद्यार्थीनिवर शारीरिक अत्याचार, गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम दिला चोप आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा विद्यार्थीनिवर शारीरिक अत्याचार, गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम दिला चोप Reviewed by सह्याद्री चौफेर on August 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.