सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (०८ ऑगस्ट) : तालुक्यातील डोंगरखर्डा येथे पिकांवरील रोग व किडींचे नियंत्रणाकरिता कीटकनाशके फवारणी करतांना संभाव्य विषबाधा टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषि विभाग व सिंजेन्टा इंडिया लिमिटेड तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यलयात सुरक्षित फवारणी कार्यशाळेचे आयोजन फवारणी करणारे शेतकरी व शेतमजूर बांधव याचे समुपदेशन करण्यासाठी करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेत सिजेंन्टा इंडिया लिमी. चे तालुका समनवयक कविष गावंडे यांनी सुरक्षित फवारणी बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने फवारणी करतांना सुरक्षा किटचा वापर, हातमोजे, चष्मा, मास्क ई. वापर करावा. फवारणीचे औषधी चे डब्यातील माहिती पत्रक वाचून घ्यावे. फुटका पंप वापरू नये, फवारणी करतांना कोणतेही व्यसन करु नये, फवारणी हवेच्या विरुद्ध दिशेने करु नये याबत मार्गदर्शन केले. चुकून विषबाधा झाल्यास औषधाचे माहिती पत्रकासहित डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
कृषि सहाय्यक महेंद्र ओंकार यांनी कापशिवरील संभाव्य गुलाबी बोंडअळी चा धोका टाळण्यासाठी एकात्मिक पध्दतीने व्यवस्थापन करणे कसे गरजेचे आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये कामगंध तसेच प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, वेळोवेळी सापळ्यातील लुर्स बद्दलविणे, जैविक ट्रायकोग्रामा कार्ड चा वापर करणे, शेतात निरीक्षण करून डोमकळया नष्ट करणे व आवश्यकता भासल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा या बाबत मार्गदर्शन केले. शेतीशाळा प्रशिक्षक भुषण मालकापुरे कृषि पर्यवेक्षक व्ही. बी. चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच याप्रसंगी कृषि सहायक पी. एल. चव्हाण, एच. टी. पवार उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती उपसरपंच निश्चल ठाकरे, ग्रा.प. सदस्य कुणाल पंचबुद्धे,राजेंद्र पांडे, सुभाष काकडे ,विठ्ठल येबरे, आकाश लाकडे, शत्रुघ्न मडावी , खेकारे, सुरेन्द्रा राठोड, ,इम्रान शेख तसेच गावातील युवा शेतकरी व फवारणी करणारे शेतमजूर बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती.
डोंगरखर्डा येथे सुरक्षित फवारणी व गुलाबी बोंडअळी बाबत मार्गदर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 08, 2021
Rating:
