टॉप बातम्या

माजलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनावणे 
बीड, (०१ ऑगस्ट) : अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर असे पानं. आपल्या लेखणीला तोफ बनवून तिच्यातून क्रांतीचे तोफगोळे फेकणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ. आपल्या डफावर परिवर्तनाची थाप देऊन जनमाणसं विद्रोहाने पेटवणारे शाहिर म्हणजे अण्णाभाऊ.

जग बदलाची भाषा बोलणारा माणुस! म्हणजे अण्णा भाऊ साठे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माजलगाव येथे त्यांना त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी माजलगाव शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पोलीस निरीक्षक मा. फराटे साहेब यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात. यावेळी मा. लहुश्री भास्कर शिंदे, दत्ता भाऊ कांबळे, प्रदीप तांबे, अभिजित देंडे, अनिल ढगे, आदींची उपस्थिती होती.
Previous Post Next Post