सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख
राळेगाव, (०१ ऑगस्ट) : राळेगाव तालुक्यात पराभूत मानसिकतेतुन काँग्रेस बाहेर पडताना दिसतं नाही, भाजपा च्या ध्येय धोरणाबाबत ग्रामीण भागात प्रचंड अस्वस्थता आहे. या मुळे तालुक्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी मनसे भरून काढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह अनेक मोठ्या गावातील शेकडो युवक मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसेत प्रवेश करीत आहे. रिधोरा, वरुड, सावरखेड, चाचोरा, किन्ही या सह विविध गाववातील युवकांनी मनसेत 'दिल से' प्रवेश करून एकच खळबळ उडवून दिली. मनसेची अशीच घोडदोड कायम राहिली तर एक सक्षम पर्याय म्हणून मनसे समोर येऊ शकते, अशी राजकीय जानकारांची प्रतिक्रिया दुर्लक्ष करण्याजोगी नाही असेच म्हणावे लागेल.
राळेगाव तालुक्यातील अनेक युवक ,विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेत असुन युवकांचा ओघ मनसेकडे वाढला आहे.
मनसे अध्यक्ष यांच्या महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दूरदृष्टी,स्वतंत्र अजेंडा ,सत्ता नसतांना प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करून जनतेला न्याय मिळवुन देण्याची शिकवण यामुळे राळेगाव तालुक्यातील अनेक युवक,विद्यार्थी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १५ वर्धापनदिनाचे औचित्य साधुन मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेवुन नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला आहे. मनसे उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर, आनंद एंबडवार, यांच्या आदेशाने व मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक विश्रामगृह येथे पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील रिधोरा, किन्ही, सावरखेडा, खेमकुंड, वरुड, चाचोरा या गावांमधील शेकडो युवक, विद्यार्थ्यांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश केला. याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे यांनी प्रवेश घेणाऱ्या युवकांचे मनसेचा झेंडा देवुन स्वागत केले व पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनसे वाहतूक सेना अध्यक्ष आरिफभाऊ शेख, गणेश काकडे, राहुल गोबाडे, जगदीश गोबाडे, विठ्ठल जोगी, अमित निकाडे, सुनील बोबडे, सागर शेंदरे, अक्षय निकम, अनिल मेश्राम, मारोती ठाकरे, रुपेश शेळके, अक्षय ढेकणे, गणेश बोबडे, उमेश पावडे, लव नैताम, मंगेश तोडसे, प्रसाद परचाके, अमोल गेडाम, रोशन बावणे, उमेश क्षीरसागर, रोशन गुरनुले, राज लांडे, वूषभ गुरनुले, गजानन ऊईके, गौवर्धन मेश्वाम, पाडूरंग ऊईके, सुरेश ठाकरे, सचिन गेडाम, राहुल पेंदोर,अर्जुन सातघरे, विकास कोसुरकर, सुरेश मंगाम, विठ्ठल जुमनाके, रोहित करपते, अरविंद करपते, गजानन करपते, सुरेश सातघरे, मंगेश मोहूर्ले, कार्तिक चांदेकर, मोहन नवले, गणेश मांदाडे, निलेश सिडाम, घनश्याम मेश्राम, सागर आत्राम, गजानन गाऊत्रे, संदीप गुरनूले, योगेश वाढई, अनिल वाढई, गजानन मोहूर्ले, मंगेश मादाडे, गोपाळ मादाडे, ऋषिकेश वाघाडे, मज्जित सैयद रहीम शेख, यशवंत घरघडे, कारण नेहरे, सौरभ तुळसकर, कुणाल घरघडे, प्रशांत पवार, नागेश देकणे, शुभम नेहारे, हर्षद गेडाम, बशीर सैयद, सुदर्शन उईके, अमित उईक, ऋतिक जमूणकर, पवन दडांजे, वित्तल शेंडे, सचिन शेंडे, रवी मडावी, करण कुमरे, योगेश कुमरे, आकाश नहरे, गौरव अत्राम, विजय नेहरे, कुणाल शेंडे, तुषार शेंडे उपस्थित होते.
राळेगाव तालुक्यात संघटन पातळीवर मनसे ची दमदार कामगिरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 01, 2021
Rating:
