सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (०१ ऑगस्ट) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांची १०१ वी जयंती मौजे अंजनी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. अंजनी गावचे सरपंच महेश पाटील हांडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजेन केले व ध्वजारोहण महेश पाटील हांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांनी अवघ्या दीड दिवस शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना बाराखडीची साधी तोंडओळखही होऊ शकत नाही, पण त्यांनी अनेक कथा कादंबरी, पोवाडे, त्यांनी लिहिलेली आहे. अण्णाभाऊ यांनी कामगार कष्टकरी वर्गातील लोकांच्या कथा व्यथा अपल्या लेखणी च्या माध्यमातून त्यांनी जगासमोर मांडले त्यांची प्रसिद्ध लावणी माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होती ही प्रसिद्ध लावणी एका नविन लग्न झालेल्या कुटुंबाची व्यथा मांडले. या महान महापुरुषांना जयंतीदिनी दिनांक १ ऑगस्ट रोजी अंजनी येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच महेश पाटील हांडे, उपसरपंच प्रतिनिधी बालाजी मुंडकर, सेवा सोसायटी चेरमन प्रतिनिधी गोविंद बद्देवाड, शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सिद्धार्थ गावंडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गावंडे, नारायण भोईवार, सखाहरी घायाळे, किशोर भरांडे, पत्रकार गौतम गावंडे, सुभाष जाधव, विश्वनाथ भरांडे, गंगाधर भोईवार, पंढरी भोईवार, शेषेराव गावंडे, जयदीप गावंडे, भगवान धानेकर यादींची उपस्थिती होती.
अंजनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 01, 2021
Rating:
