सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव, (०२ऑगस्ट) : मारेगाव येथील शासकीय कामकाजाचा तालुक्यातील नागरिकांना अनुभव चांगला ज्ञात आहे. इथलं शासकीय खातं येणाऱ्या नागरिकांचे समाधान होत नसल्याच्या तक्रारीला काही कमी नाही. एक ना धड भाराभर चिंद्या अशीच काहींशी अवस्था असे बोलल्या जात आहे. त्यातच भूमी अभिलेख कार्यालय तर विचारूच नका, असे तालुक्यातील शेतकरी सांगतात. भूमिअभिलेख येथील गलथान कारभार नुकताच चहाट्यावर आला आहे. खरेदी केलेल्या शेताची चुकीच्या पद्धतीने मोजणी शीट तयार केल्याचा मनस्ताप सहन न झाल्यामुळे हटवांजरी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली.
आत्महत्ये पूर्वी त्या पीडित शेतकऱ्याने ३ जुलै २०२० रोजी वरिष्ठांकडे भूमी अभिलेख कार्यालय मारेगाव यांच्या विरोधात रितसर तक्रार अर्ज दाखल केला होता. अहो या तक्रारीची साधी दखल भूमी अभिलेख कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. आत्महत्येपूर्वी पीडित शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालय मारेगाव यांच्या विरोधात रीतसर तक्रार अर्ज दाखल केला होता.
या तक्रारीची दखल घेत वरिष्ठांनी तक्रारीतील मुद्याचे अवलोकन करून खात्री करावी, मुद्यांचे अनुषंगाने निरसर करून तक्रार कर्त्यांना निकाली उत्तर देऊन निकाली उत्तराचे प्रतिसह आवश्यक कार्यालयीन अभिलेखासह साक्षांकित प्रति सोबत स्वयंस्पष्ट अहवाल या कार्यालयात अतिसत्वर सादर करावा अन्यथा होणाऱ्या विलंबास आपण कार्यलय प्रमुख म्हणून स्वतः जबाबदार राहाल अशा आशयाच्या सुचनाने पत्र जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यवतमाळ यांनी ६ जुलै २०२० रोजी स्थानिक उपअधीक्षक भूमी अभिलेख मारेगाव यांना देण्यात आले होते. मात्र, या पत्रालाही येथील कार्यालय प्रामुख्याने उत्तर देण्यास तसदी घेतली नाही तशा पद्धतीची कारवाई केली नाही.
तब्बल वर्ष लोटून दुसरा शेती हंगाम सुरू झाला असूनही वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनाने स्थानिक कार्यालयातून अवेहलाना झाली. असल्याने आता आपण न्याय मागायचा तरी कोणाकडे ?
या अनुत्तरीत प्रश्नाच्या विवंचनेत हटवांजरी येथील देवराव लटारी फरताडे या तरुण शेतकऱ्याने आपली संघर्ष यात्रा संपवली आहे. या तफावत सिस्टीमचा कारवाईतुन या शेतकऱ्यांचे मनोबल पूर्णपणे खच्चीकरण केल्या गेले असून, तफावत सिस्टीमच्या नैराश्यातून आत्महत्येचा इशारा कार्यालयाला देत देवराव लटारी फरताडे रा. हटवांजरी या शेतकऱ्यांने विषारी द्रव प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली आहे. या घटनेने तालुक्यातून ज्यांना ज्यांना येथील भूमी अभिलेख चा अनुभव आला, जो तो या घटनेने संताप व्यक्त करीत आहे.
या प्रकरणाची वरीष्ठ पातळीवरून चौकशी लागल्यास मोठे रॅकेट गळ्याला लागण्याची शक्यता वर्तविली आहे .
भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार! अन 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 02, 2021
Rating:
