सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (०८ ऑगस्ट) : तालुक्यातील गडचांदूर जवळील अमलनाला धरण येथे वेस्ट वेअर चा आनंद लुटण्याकरिता आलेल्या दोन मुलांना वाचवण्याच्या नादामध्ये वेस्टवेअरच्या पाण्यात बुडून चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर वार्ड रहिवासी विनायक भानुदास चट्टे (२४) या युवकाचा मृत्यू झाला.
उद्याला त्याचा वाढदिवस असल्याचे समजते, हाच आनंद घेण्याकरिता परिवारासह मित्रांसोबत तो अमलनाला वेस्टवेअर ला आला होता. मात्र त्याचा आनंद हिरावून घेतल्याने मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथून काही कुटुंब पर्यटन पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी या पर्यटनस्थळी आले होते. आनंद घेत असतांना यात दोन लहान मुले बुडाल्याचे पाहून त्यांना वाचविण्याच्या बेतात त्या २४ वर्षीय युवकांचा बळी गेला आहे.
गडचांदूर शहरापासून अवघ्या ४ किमी अंतरावर असलेल्या माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या अंमलनाला धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने येथील आकर्षक, नैसर्गिक, मनमोहक वातावरण सहज मनुष्याला मोहून टाकत असल्याने येथील अस्वाद घेण्यासाठी परिसरातील पर्यटकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. येथील वेस्टवेअर वरून वाहणारे पाणी पर्यटकांना भुरळ घालत असल्याने येथे गर्दी होत असते. परंतु ह्या ठिकाणी प्रत्येक वर्षी एक ना एक जीव जातो, हे जग जाहिर असतांना प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमने गरजेचे आहे.
दूर दूरचे या ठिकाणी पर्यटक येतात. परंतु या ठिकाणी प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याने पर्यटकांच्या आनंदावर दुःखाचे डोंगर कोसळत आहे. परिणामी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. व तरूणांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली होती.
लहान मुलाला वाचवण्याच्या नादात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 08, 2021
Rating:
